पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. पद्मपुराणानें तर भागवतमाहात्म्यच लिहिलेले आहे. नारदपुराणांत जी भागवताची विषयानुक्रमणिका दिलेली आहे, ती पाहिली तर ती वैष्णव- भागवताचीच दिली आहे असे दिसून येतें, इतकेच नव्हे तर तेव्हां भागवत सध्याच्या प्रमाणेच होते असे कळेल. यावरून मत्स्य, नारद व पाद्म ही पुराणें विष्णुभा. च महापुराण मानतात हैं कळून येईल; पण "शिव- पुराण, देवीयामल वगैरे ग्रंथांत देवीभागवतच महापुराण धरिलेलें आहे; मत्स्यपुराणोक्त ' सारस्वतकल्प ' श्रीमद्भागवतांत नाहीं, पाद्मकल्याचा प्रसंग आहे; तसेंच, ८९ हयग्रीवब्रह्मविद्या यत्र ब्रह्मवधस्तथा । गायत्र्या च समारंभस्तद्वै भागवतं विदुः ॥ असें जें चित्सुखाचार्यांच्या 'भागवत कथा संग्रहांत ' लक्षण दिले आहे, त्यांतील वृत्रासुरवधाची कथा. दोन्ही पुराणांत असली तरी हयग्री - वाला ब्रह्मविद्यालाभ झाल्याची कथा विष्णुभागवतांत नाहीं, त्याचा विस्तार देवीभागवतांतच आहे; यामुळे दे. भा. च महापुराण होय, " असें दुसऱ्या पक्षाचे मत आहे. यास उत्तर असें आहे कीं, श्रीधरस्वामींनीं ( ' द्वात्रिंशत्त्रिशतं च यस्य विलसत् ' ) भागवतांत ३३२ अध्याय आहेत अर्से म्हटले आहे व त्याचप्रमाणें, काशीनाथानें दुर्जनमुखमहाचपेटिकेंत चित्सुखानें उतरून घेतलेला पुराणार्णवाचा खालील श्लोक दिलेला आहे. स्कंधा द्वादश एवात्र कृष्णेन विहिताः शुभाः । द्वात्रिशत्त्रिंशतं पूर्णमध्यायाः परिकीर्तिताः ॥ हा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. यानें चित्सुखापूर्वीच्या पुराणार्णवांतही श्रीमद्भागवतच महापुराण धरिलेलें आहे हे कळून येतें. शिवाय, यावरून हेंही सिद्ध होतें कीं चित्सुखापूर्वीच भागवतांत ३३२ अध्याय होते;