. पुराण निरीक्षण. म्हणजे इ० स० ८०० च्या पूर्वीच त्यांत हल्लींइतके - ३३२ अध्याय- होते. चित्सुखापूर्वीच्या पुराणार्णवाच्या वेळींही भागवत हल्लींसारखें होतें असे मानण्यास हरकत दिसत नाहीं ! चित्सुखाचार्यांचा 6. भागवतकथा- संग्रह, ' हनुमानाची भागवतावरील टीका, व पुराणार्णव आज उपलब्ध होतील तर आणखीही नवा प्रकाश पडेल ! बहुधा या तिघांच्याही वेळीं देवीभागवत नसावें ! तें ८०० ते ११०० च्या दरम्यान निघाले असावें. १ ९० श्रीमद्भागवताचें महत्त्व. सर्ववेदांतसारं हि श्रीभागवतमिष्यते । तद्रसामृततृप्तस्य नान्यत्र स्याद्रतिः कचित् || भागवत, १२-१३-१५. श्रीमद्भागवत वेदांतदृष्ट्या अतिशय महत्त्वाचें असल्यामुळे व त्यामुळे मनुष्यास परमेश्वराच्या ठाई रति उत्पन्न होत असल्यामुळे यांतून गौड- पाद, शंकर, मध्व इत्यादि आचार्यांनीं उतारे घेतलेले आहेत; शिवाय, हनुमत्, चित्सुख, शंकर, मध्व इत्यादिकांपासून तो तहत आजमिती- पर्यंत शेकडोंजणांनी त्यावर टीका लिहून आपणांस पुनीत करून घेतलेलें आहे; तसेंच याची अनेक भाषांत भाषांतरें झालेली आहेत !! याइतकें लोकप्रिय पुराण दुसरें कोणतेंही नाहीं. वैष्णवधर्माची त्रयी ! श्रीमद्भगवद्गीता, विष्णुपुराण व भागवत ही वैष्णवधर्माची त्रयी आहे. श्रीधरस्वामींची या तिन्हीवरही टीका आहे. हनुमानाची गीता व भागवतावर आहे; विष्णुपुराणावर असल्याची माहिती नाहीं. चित्सु खांची गीतेवर टीका असल्याबद्दल माहिती नाहीं. भागवत व विष्णु-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही