पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. यावरून, याच्या पूर्वभागांत चार पाद, व उत्तरभाग असे विभाग अस ल्याचे कळून येईल. हल्लीं उपलब्ध असून मुंबईस छापलेल्या नारद- पुराणांत प्रायः हे सर्व विषय आहेत. प्रचलित नारदपुराणाची संख्या प्राय: २३००० आहे. M विल्सन साहेबांस फक्त ३००० श्लोक मिळाले होते; संपूर्ण नारद- पुराण त्यांस पहाण्यास मिळाले नव्हते. त्यांस मिळालेल्या भागांतील विष यांची सूची पहातां असें कळून येतें कीं, नारदपुराणाच्या उत्तर भागांतील फक्त पहिले ३७ अध्याय त्यांस मिळाले होते; म्हणून त्यांस नारद- पुराणांत संपूर्ण पुराणलक्षण दिसलें नाहीं. मत्स्यपुराणांत या पुराणाचें येणेंप्रमाणें लक्षण दिलेले आहे:- यत्राह नारदो धर्मान् बृहत्कल्पाश्रयानिह । पंचविंशत्सहस्राणि नारदीयं तदुच्यते ॥ - हल्ली छापलेलें नारदपुराणच मत्स्याचें नारदपुराण होय, असें लक्षणां- वरून कळून येतें. हा ११ व्या शतकांत उत्पन्न झालेला एक भक्तिग्रंथ असावा असें विल्सनचें मत आहे; पण ११ व्या शतकांत आलू विरुणीनें याचा उल्लेख केलेला असून, वाराव्या शतकांत दानसागरांत यांतील उतारे गौड- देशच्या राजा बल्लाळसेनानें घेतले आहेत. याचा उत्तरभाग जरी वैष्णव- सांप्रदायाचा दिसला तरी पूर्वभाग बराच जुना दिसतो; कदाचित् याचा मूळ प्राचीन अंश बराच लुप्त झालेला असण्याचा संभव आहे. १. पद्मपुराणाच्या निरीक्षणांत दाखविलेलेंच आहे कीं, नारदपुराणानें विषयसूची देते वेळी त्या पुराणांत मायावादनिंदा, पाखंडलक्षण, हीं व असला मतद्वेषाचा मजकूर नव्हता. यावरून या पुराणांतील पुराणवर्णन मतद्वेषोत्पत्तीच्या पूर्वीच आहे हे कळून येतें.