पुराणनिरीक्षण. २. तसेंच, विष्णुपुराणनिरीक्षणांत असे दाखविलें आहे कीं, या पुराणांतील पुराणसूची बहुधा शंकराचार्योहूनही प्राचीन, म्हणजे ५०० ते ६०० च्या सुमारची असावी. असो. बृहन्नारदपुराण नांवाचाही एक वैष्णवग्रंथ छापलेला आहे; परंतु तो महापुराण नव्हे; उपपुराणांत त्याची गणना करितां येईल. लघुबृहन्नारदीय नांवाच्याही चोपड्या मिळतात; पण त्यांचीही गणना उपपुराणांत करणे जरूर दिसतें. मार्केडेयपुराण, ७ वें. नारदपुराणानें या पुराणाची याप्रमाणें सूची दिलेली आहे:- अथातः संप्रवक्ष्यामि मार्केडेयाभिधं मुने । पुराणं सुमहत् पुण्यं पठतां शृण्वतां सदा यत्राधिकृत्य शकुनीन्त्सर्वधर्मनिरूपणम् । मार्केडेयेन मुनिना जैमिनेः प्राक् समीरितम् ॥ पक्षिणां धर्मसंज्ञानां ततो जन्म निरूपणम् । पूर्वजन्मकथा येषां विक्रिया च दिवस्पते || तीर्थयात्राबलस्यातो द्रौपदेयकथानकम् । हरिश्चंद्रकथा पुण्या युद्धमाडीबकाभिधम् || पितापुत्रसमाख्यानं दत्तात्रेयकथा ततः । हैहयस्याथ चरितं महाख्यानसमाचितम् || मदालसाकथा प्रोक्ता अलर्कचरितान्विता । सृष्टिसंकीर्तनं पुण्यं नवधा परिकीर्तितम् ।। -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही