पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराण निरीक्षण. विल्सन साहेबांस मिळालेल्या प्रतीत सुमारें १५ हजार श्लोक होते. आनंदाश्रमांत छापलेल्या प्रतीत ३८३ अध्याय व ११४५७ श्लोक आहेत; पण आनंदाश्रमाच्या श्लोकगणनापद्धतीत कित्येक श्लोकार्धाची गणनाच केलेली नसल्यामुळे आनंदाश्रमी प्रत सामान्यतः १२ हजारांची आहे असे म्हणतां येईल. विल्सनच्या दुसऱ्या दोन प्रती सुमारे १२ हजारांच्याच होत्या; पैकी एक अकवरच्या वेळची व दुसरी इ० स० १८५९ मधील होती ! * 300 प्रचलित अग्निपुराणाचा मुख्य उद्देश अग्नीची स्तुति हा नसून, सर्व- विद्या-परा व अपरा- सांगण्याचा आहे. पहा:- आग्नेये हि पुराणेऽस्मिन् सर्वविद्याः प्रदर्शिताः । अ. ३८३, श्लोक ५२.

  • अध्याय २७२ मध्ये या पुराणाची संख्या व लक्षणें अशी दिलेली आहेत.

अग्निना यद्वसिष्टाय प्रोक्तं चाग्नेयमेव तत् ॥ १० ॥ द्वादशैव सहस्राणि सर्वविद्यावबोधकम् | तेव्हां हें सर्व विद्यावबोधक स्वरूप हें पुराण १२ हजारांचें झाल्यानंतरचें लक्षण दिसतं ! या पुराणाच्या शेवटींही ( ३८३-६५ ) असा एक श्लोक आहे:- इदं द्वादशसाहस्रं शतकोटिप्रविस्तरम् । देवानां हितकामेन संक्षिप्योद्गीतमग्निना ॥ " " यावरून हें पूर्वी १२ हजारांहून अधिक असून हल्ह्रींचें १२ हजारांचें हें स्वरूप संक्षिप्त आहे हे व्यक्त होते. येथे ' द्वादशसाहस्रं' बद्दल ' पंचदश, ‘ चतुर्दश ' असे पाठभेदही आहेत; पण ते छंदास जुळत नाहींत; शिवाय, मागील श्लोकांत ' द्वादशसाहस्रं ' स्पष्टच आहे. नारदसूचीच्या वेळी वसिष्ठाग्नि- संवाद व ईशानकल्पवृत्तांत यांत असतां याची संख्या १५९१६ हजार होती व आतां त्याचें १२ हजारांचें संक्षिप्त स्वरूप राहिलेले आहे हे कळून येतें.