पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे, १०१ यावरून विल्सनचें असें मत आहे कीं, हें मूळ अग्निपुराण नसावें. ( It may be doubted if a single line of it be original ) असें जरी आहे तरी ज्यांवरून हल्लींचें अग्निपुराण तयार करण्यांत आले आहे ते ग्रंथ प्राचीनतर असून, अग्निपुराणांत त्यांचा संग्रह ख्रिस्ती शकानंतर बऱ्याच काळानें केलेला असावा असें त्यांचें मत आहे. हल्लींचें स्वरूप केव्हां आलें ? हा प्रश्न अति महत्त्वाचा आहे; कारण, यावरून नारदसूचीचा काळही ठरेल. आम्ही यापूर्वीच नारदसूची शंकराचार्यांहून पूर्वी बहुधा ५०० ते ७०० च्या दरम्यान तयार झालेली असावी असें ठरविलेले आहे. हेंच अनुमान आतां जे आम्ही अग्निपुराणाच्या सद्यःस्वरूपाविषयीं लिहिणार आहों त्यावरूनही दृढ होईल. अग्निपुराण ३९ व्या अध्यायांत २५ तंत्रांची नांवें आहेत; व दुसरी- कडेही युद्धजयार्णव, कुब्जिकामत इत्यादि तंत्रांचा उल्लेख आहे; यावरून कित्येकजण हा ग्रंथ तंत्रकालाच्या नंतरचा समजतात; पण तंत्रकाळ म्हणजे काय ? अलीकडे पंडित हरप्रसादशास्त्री वगैरेंनी नेपाळदरबारच्या पोथ्या तपासून जे शोध लाविलेले आहेत त्यांवरून तांत्रिक वाङ्मय बरेंच प्राचीन आहे हे कळून आलेले आहे. कुब्जिकातंत्राची, गुप्तलिपीतील सुमारें सहाव्या शतकांतली एक प्रत नुकतीच मिळालेली आहे. यावरून कुब्जि- कातंत्र व कुब्जिकामत निदान २०० ३०० वर्षे या पोथीहून तरी प्राचीन असली पाहिजेत हैं कळून येईल; म्हणजे इ० स० ३००/४०० इतकें तरी हैं मत प्राचीन असेल, याहूनही पूर्वीचेंच असेल; पण अर्वाचीन कांहीं ! दुसरे असे की, अग्निपुराणाचें सद्य:स्वरूप ठरविण्याला दुसरीही