पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. कांहीं साधनें आहेत. अग्निपुराणकर्त्यानें खालील धर्मशास्त्रे पाहून धर्मशा- स्त्रांचा संग्रह केलेला आहे:- १०२ - मनुर्विष्णुर्याज्ञवल्क्यो हारीतोऽत्रिर्यमोंऽगिराः । वसिष्ठदक्षसंवर्तशातातपपराशराः ॥ १ ॥ आपस्तंबोशनोव्यासाः कात्यायनबृहस्पती | गौतमः शंखलिखितौ धर्ममेते यथाऽब्रुवन् || २ || अध्याय १६२. यावरून अग्निपुराणकर्त्यानें आपलें धर्मशास्त्रसार वरील स्मृतींवरून बनविलें हैं कळून येतें. वृद्धशातातपस्मृति म्हणून एक स्मृतिग्रंथ आहे; त्यांत या ' वन्हिधर्म- शास्त्रा ' चा स्पष्ट उल्लेख आहे : -- पितुः सा भजते गोत्रं ऊर्ध्वं तु पतिपितृकम् । इति प्रोक्तं पुरा वन्हि - धर्मशास्त्रानुसारतः ॥ ४३ ॥ - आतां ही शातातपस्मृति किती प्राचीन आहे हैं आपण पाहिले पाहिजे; त्याशिवाय या प्रमाणाचा उपयोग काय होणार ? श्रीशंकराचार्यांनी आपल्या विष्णुसहस्रनामभाष्यांत या वृद्धशाता- तपस्मृतींतील उतारे घेतलेले आहेत. यावरून वृद्धशा. स्मृति त्यांच्याहून १००-१५० वर्षे तरी प्राचीनतर असली पाहिजे. म्हणजे वृद्धशा. स्मृति सुमारें ७०० इ०स० ची तरी असली पाहिजे! त्या स्मृतींत 'पुरा प्रोक्तं ' म्हणण्याइतकें वन्हिधर्मशास्त्र प्राचीन असले पाहिजे; म्हणजे १००-१५० वर्षे तरी तें प्राचीन-निदानपक्ष–असले पाहिजे. म्हणजे वन्हिधर्मशास्त्र निदान ५००-५५० इ० स० इतकें तरी प्राचीन असले पाहिजे.