पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

x ३ कथा एके ढाई सांगणारा ग्रंथ नव्हे; तसाही एकादा ग्रंथ, जमल्यास पुढें- मागे माझ्या मनांतून लिहावयाचा आहे; पण तो स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे हैं मला येथें सांगणें जरूर वाटतें हैं पुस्तक म्हणजे पुराणांविषयीं सर्व तऱ्हेच्या माहितीनें भरलेलें एक निदर्शक आहे, हे वाचकांन केव्हांही विसरतां काम नये. पुराण वाचण्यापूर्वी हैं पुस्तक वाचलेलें अस- ल्यास पुराणांविषयीं अधिक विस्तृत व चांगली माहिती मिळेल. पुराणां- विषयीं इतकी माहिती एकेठाई कोणत्याच भाषेंतील पुस्तकांत नाहीं; पण हे पुस्तक वाचलें म्हणजे पुराणे वाचण्याची गरज राहणार नाहीं अशी माल कोणी समज करून घेऊं नये; उलट, हैं वाचल्यामुळे पुराणें ही ' शिमगा ' न समजतां, तीं अधिक काळजीपूर्वक वाचण्यास वाचकांस स्फूर्ति झाल्यास या पुस्तकाचें कार्य बरोबर झाले असें मी समजेन. वैद्य-त्र्यंबक गुरुनाथ काळे, पनवेल.