पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. धर्मे कामे च मोक्षे तु विष्णोश्चापि शिवस्य च ॥ द्वितीये च तृतीये च सौरो वर्गचतुष्टये । प्रतिसर्गाव्हयं त्वत्यं प्रोक्तं सर्वकथाचितम् || सभविष्यं विनिर्दिष्ट पर्व व्यासेन धीमता । चतुर्दशसहस्रं तु पुराणं परिकीर्तितम् || भविष्यत्सर्वदेवानां साम्यं यत्र प्रकीर्तितम् । गुणानां तारतम्येन समं ब्रह्मेति हि श्रुतिः यावरून पहातां, भविष्यपुराणांत पांच पवें असून तें ब्रह्मयानें मनूला सांगि- तलें व त्यांत अघोरकल्पवृत्तांत आहे हे कळून येईल. याची संख्या १४००० होती. याच पांच पवें. पहिलें, ब्राह्मपर्व. यांत प्रायः आदित्यचरित असून सर्व प्रकारची आख्यानें, सृष्टिलक्षणें, सर्व शास्त्रांचें स्वरूप, पुस्तक, लेखक व लेख्य यांचें स्वरूप, संस्कारांचे स्वरूप व प्रतिपदादि सात तिथींचे कल्प हे विषय आहेत. अष्टमी आदि शेषकल्प विष्णुपर्वीत आहेत. शैवपर्वत कामा- शिवाय इतर विषय आहेत. सौरपवत अंत्य कथा आहेत. त्यानंतर नाना आख्यानांनी भरलेले प्रतिसर्गपर्व आहे; व त्यांतच पुराणाचा उप- संहार आहे. हीं पांच पर्वे होत ! या पांच पर्वात, धर्म या पुरुषार्थात ब्रह्माचा किंवा ब्राह्मपर्वाचा महिमा अधिक; धर्म, काम व मोक्ष यांत विष्णूचा अगर विष्णुपर्वाचा अधिक, अर्थ व काम यांत शिवाचा किंवा शैवपर्वाचा, व वर्गचतुष्टयांत सौराचा किंवा सौरपर्वाचा महिमा अधिक म्हणून जाणावा. प्रतिसर्गपर्व हैं शेवटचें

  • विष्णु, शैव व सौर या पर्वात काय विषय आहेत हैं नीट कळत नाहीं !