प्रकरण दुसरे ११५ कन्येशीं विवाह, भर्तृहरि, विक्रम, व्याडि, पाणिनि, वररुचि, बोपदेव, श्रीधर, कात्यायन, पतंजलि, शालिवाहन, जीजस क्राईस्ट पृथ्वीराज, मुकुल ( मोंगल ), तिभिरलिंग ( तैमूरलंग ), रामानंद, निंबादित्य, मध्वाचार्य, श्रीधर, विष्णुस्वामी, भट्टोजी दीक्षित, वराहमिहिर, शंकराचार्य, जयदेव, कबीर, पीपा, नानक इत्यादि साधुसंत व अकबर, सेलीम, अवरंगजेब, शिवाजी, मोंगल, नादिरशहा, गुरुंड वगैरे व्यक्तींचे वर्णन आहे. यांत इंग्रजी शब्दही आहेत; एकूण या पर्वात फारच घोटाळा आहे. कैनाकल यवनांनंतर कोणत्याही पुराणांत पुढचीं भविष्यें नाहींत; पण भविष्यपुराणानें प्रतिसृष्टि निर्माण करून आपले भविष्य इंग्रजांपर्यंत अगदी Up-to-date आणून ठेविलें आहे. गुरुंड भाषेचा मासला पहाः - रविवारे च संडे चं फाल्गुने चैव फर्वरी । षष्टिः सिक्टीति च ज्ञेया तदुदाहरमीरितम् || प्रतिसर्ग १-६-३७. इतकें सविस्तर भविष्य दुसरें कोठेंच नाहीं. लॉर्ड रे, विकटोरिया ( विकटावती ) वगैरेची नांवें देखील आहेत; पण एडवर्द व जॉर्ज मात्र कां नाहींत कोणास माहीत ? ज्या व्यासांना येथपर्यंत दिसले त्यांस पुढलें कां दिसूं नये ? असो. यांत एकंदर १०० अध्याय व ६२३२ श्लोक आहेत; व तिन्ही पर्वोची बेरीज मिळून येथे १८३८२ होते. भविष्योत्तर तर स्वतंत्रच ग्रंथ आहे. शेवटीं, “ सप्तश्लोकसहस्राणि खंडे ऽस्मिन्कथितं मया । अतश्रोत्तरखंड हि वर्णयामि पुनः शृणु ॥ " असे म्हटले आहे; पण प्रतिसर्गात ७००० श्लोक नाहींत. जवळ जवळ ८०० कमी आहेत.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही