पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ पुराणनिरीक्षण, रासक्रीडा च गोपीभिः शारदी समुदाहृता । रहस्ये राधया क्रीडा वर्णिता बहुविस्तरा || सहाऽक्रूरेण तत्पश्चान्मथुरागमनं हरेः । कंसादीनां वधे वृत्ते स्यादस्य द्विजसंस्कृतिः ॥ काश्यां संदीपनेः पश्चाद्विद्योपादानमद्भुतम् । यवनस्य वधः पश्चाद् द्वारकागमनं हरेः || नरकादेिवधस्तत्र कृष्णेन विहितोऽद्भुतः । कृष्णखंडमिदं विप्र ! नृणां संसारखंडनम् || मत्स्य व नारदोक्त लक्षणांशीं प्रचलित ब्रह्मवैवर्ताची ऐक्यता नाहीं. रथंतरकथन, सावर्णिनारदसंवाद, ब्रहावराहवृत्तांत, किंवा ब्रह्माचा वितर्त- प्रसंग ह्यांपैकी एकही प्रसंग प्रचलित ब्रह्मवै. पुराणांत नाहीं. प्रचलित पुराणांत ब्रह्मादि तेच चार खंड असले तरी कित्येक विषयांत दोहोंचा मेळ नाही. नारदोक्त ब्रहाखंडांतील सृष्टिप्रकरण, नारदब्रह्मविवाद, नारदाचें शिवलोक जाणें व ज्ञानप्राप्ति करून घेणें, हे विषय जरी ब्रहाखंडांत हल्लीं असले तरी नारद-मरीचि यांचें सिद्धाश्रमी गमन, व सावर्णि याशी संवाद - हे विषय नाहींत. प्रकृतिखंडांत सावर्णिनारदसंवाद व मुख्यतः कृष्णमाहात्म्यकथा जी असावयाची ती हल्लीं नाहीं ! गौणरूपानें कृष्णकथा आहे; परंतु प्रकृतीचें माहात्म्य व पूजा इत्यादिकांचा विस्तार आहे. गणेशखंड व कृष्ण- जन्मखंड यांतील विषय मात्र सर्व यथास्थित आहेत. पं. ज्वालाप्रसाद यांनी या पुराणाविषयी बराच विचार करून असें ठरविलें आहे कीं, कित्येक स्थळी जरी अर्वाचीन मजकूर प्रक्षिप्त असला व पुराणास नवा संस्कार मिळालेला असला तरी बाकीचा सर्व क्रम व कथाभाग यांत पूर्वी- प्रमाणेच असावा.