प्रकरण दुसरे, १२३ निर्णयसिंधूंत लघुब्रह्मवैवर्ताचा उल्लेख आहे; पण तें हल्ली मिळत नाहीं.. दाक्षिणात्यांतील ब्रह्मवैवर्तीत ब्रह्मवैवर्ताची वरांच अधिक लक्षणे आहेत असें पं. ज्वा. प्र. यांचे मत आहे. विल्सन साहेबांच्या मतानें देखीलं मात्स्योक्त ब्रह्मवैवर्ताहून हल्लींचें ब्रह्मवैवर्त अर्वाचीन, नूतनसंस्कृत व अत- एव भिन्न आहे; यांत हल्ली राधाकृष्णांची उपासना विशेष वाढविलेली आहे. यामुळे मूळचा जुना मजकूर यांत बराच कमी असून अर्वाचीन मजकूरच अधिक आहे, असे त्यांचें मत आहे; व तें पं. ज्वालाप्रसाद यांच्या मताशीं बहुतेक जुळते. यांतील उतारे श्रीशंकराचार्यांनीं विष्णुसहस्रनामभाष्यांत घेतलेले आहेत. लिंगपुराण, ११ वें. मत्स्यपुराणमतें याचें लक्षण असें :-- यत्राग्निलिंगमध्यस्थ: प्राह देवो महेश्वरः । धर्मार्थकाममोक्षार्थं आग्नेयमधिकृत्य च ॥ कल्पांतं लिंगमित्युक्तं पुराणं ब्रह्मणा स्वयम् । तदेकादशसाहस्रं फाल्गुन्यां यः प्रयच्छति ॥ - मत्स्य पु. ५३-३७. नारदपुराणांत याची सूची येणेंप्रमाणे दिलेली आहे:-- शृणु पुत्र ! प्रवक्ष्यामि पुराणं लिंगसंज्ञितम् । पठतां शृण्वतां चैव भुक्तिमुक्तिप्रदायकम् ।। यच्च लिंगाभिधं तिष्ठन्वन्हिलिंगे हरोऽभ्यधात् । मह्यं ब्रह्मादिसिध्यन्तमग्निकल्पकथाश्रयम् ॥ तदेव व्यासदेवेन भागद्वयसमाचितम् ।
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१३८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही