प्रकरण दुसरें. पंचमो देवकांडाख्यो दक्षकांडस्ततः परम् । सप्तमस्तु मुनिश्रेष्ठा उपदेश इति स्मृतः । ( १ ) हल्ली मिळत असलेल्या सनत्कुमारसंहितेंत खंड मिळत नाहीत. ( २ ) सूतसंहिता ६ हजारांची; तिच्यांत शिवमाहात्म्यखंड, ज्ञान खंड, मुक्तिखंड व यज्ञवैभवखंड, (उपरिभाग ) असे चार खंड मिळतात. ( ३ ) शंकरसंहिता ३० हजारांची; तिच्यांत अनेक खंड आहेत; त्यांपैकी पहिले खंड शिवरहस्य नांवाचें; ते १३ हजारांचें. त्यांत सात कांड - संभवकांड, आसुरकांड माहेंद्रकांड, युद्धकांड, देवकांड, दक्षकांड व उपदेशकांड- ही त्यांची नांवें ! ( ४ ) वैष्णवसंहिता व ( ५ ) ब्राह्मसंहिता मिळत नाहीं. ( ६ ) सौरसंहिता एक हजारांची. यांतही खंडविभाग नाही. कांहीं कांही संहितांतील किरकोळ खंडेही मिळतात त्यांची नांवें अशी: भूमिखंड, उत्कलखंड, वैष्णवखंड, ब्रह्मखंड, ब्रह्मोत्तरखंड, पातालखंड, ब्रह्मांडखंड, काशीखंड, केदारखंड, रेवाखंड, अवंतीखंड, तापीखंड, नागर- ·खंड, प्रभासखंड इत्यादि. एकूण १९ खंडांची नांवें कळल्यासारखी झाली ! बाकीची ३१ खंडांचीं नांवें अजून कळत नाहींत !!! १३३ स्कंदपुराणाच्या काशीखंडाची एक शके ९३० सालची प्रत विश्वकोश कार्यालयांत आहे; तिच्याशीं प्रचलित काशीखंड बहुधा जमतें, असें पं. ज्वालाप्रसाद यांचें मत आहे. तेव्हां या खंडाची उत्पत्ति याहीपूर्वी किती- तरी वर्षे झाली असली पाहिजे हैं उघड आहे. महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री यांना नेपाळच्या राजपुस्तकालयांत ख्रिस्ती शकाच्या सहाव्या शतकांत लिहिलेली एक स्कंदपुराणाची पोथी पाहण्यास मिळाली ! शास्त्रीमजकुरांनी नेपाळदरबारच्या राजपुस्तकालयांतील पोथ्यांच्या सूचत या स्कंदपुराणाच्या पोथीच्या प्रत्येक अध्यायाची सूची
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही