पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ पुराणानिरीक्षण. दिलेली आहे; पण ही पोथी स्कंदपुराणाच्या कोणत्या संहितेपैकी किंवा खंडापैकी होती, याविषयीं त्यांनीं कांहीं लिहिलेले नाहीं. तथापि अध्याय- सूचीवरून हरप्रसादशास्त्री यांस मिळालेली पोथी अंबिकाखंडाची असावी, असे पं. ज्वालाप्रसाद यांनी ठरविलेले आहे. याविषयीं उक्त पंडितजी म्हणतात कीं, " नारदपुराणांत या अंविकाखंडाची गणना सात खंडांत केलेली नाहीं, ही आश्चर्याची गोष्ट होय; परंतु अंबिकाखंडाची पोथी व शंकरसंहितेंतील खंडादिकांतील विषय यांचें निरीक्षण करून पहातां, हैं खंड स्कंदपुराणांतर्गत आहे यांत शंका राहत नाहीं. आजपर्यंत जितक्या पौराणिक पोथ्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांत नेपाळची वरील प्रत प्राचीनतम होय !" आमचे मतें नारदपुराणांत उक्त खंडाचें नांव नं मिळ- प्याचें कारण असे आहे की, तेव्हां स्कंदपुराणाच्या पद्संहिता व तदंतर्गत पंचाशत्खंडात्मक विभाग प्रचलित होते, नारदसूचीच्या वेळेच्याप्रमाणें सप्तमहाखंडात्मक विभागपद्धति तेव्हां प्रचलित नव्हती. हरप्रसादशास्त्री यांस मिळालेला स्कंदपुराणाचा हा भाग म्हणजे ५० खंडांपैकी एक खंड ( अंबिकाखंड ) असावें; यामुळे त्याची गणना नारदीय सप्तमहाखंडांत येत नाहीं, हैं उघडच आहे. यावरून दुसरी एक गोष्ट सिद्ध होते की, नारदसूचींत स्कंदपुराणाची पंचाशत्खंडात्मक विभागपद्धति नसून सप्तमहाखंडात्मक पद्धति असल्यामुळें या पुराणांतील ही पुराणसूची इ. स. च्या साहव्या शतकानंतरची असली

  • या पोथीच्या काळाविषयीं बाबू ज्ञानेंद्रनाथ मित्र हे आपल्या श्रीकृष्ण

नामक इंग्रजी पुस्तकांत लिहितात कों: --- “ In the library of the Asiatic Society of Bengal, there is a copy of the Skanda Purāna found in the Nepal Durbar Library, which has a colophon proving it to be at least as old as the sixth century A. D. यावरूनही पोथी निदान साहाव्या शतकाइतकी तरी प्राचीन असली पाहिजे, हे उघड आहे. याहूनही ती प्राचीनतर असूं शकेल.