पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें, १३५ पाहिजे; म्हणजे ती इ. स. ५००-६०० दरम्यानची असली पाहिजे. मागें आम्ही ही सूची याच दरम्यानची ठरविलेली आहे; ती पाहिजे तर जरा ५०-७५ वर्षे पुढें न्यावी. पण ती शंकराचार्याच्या पूर्वीची तर असलीच पाहिजे, हें आपण विष्णुपुराण ( व अग्निपुराण ) यांच्या निरी- क्षणांत पाहिलेंच आहे. ही सूची सामान्यत: इ. स. ५००-६०० च्या दरम्यानची धरण्यास विलकुल हरकत दिसत नाहीं ! मत्स्यपुराणानें या पुराणाचें लक्षण असें दिलेले आहे की:- यत्र माहेश्वरान्धर्मानधिकृत्य च षण्मुखः । कल्पे तत्पुरुषे वृत्तं चरितैरुपबृंहितम् ॥ स्कांदं नाम पुराणं तत् एकाशीति निगद्यते । सहस्राणि शतं चैकमिति मर्येषु गद्यते ॥ हल्लीं जो भाग उपलब्ध होत आहे तो सर्व मत्स्योक्त स्कंदपुराणाचाच आहे की काय याबद्दल शंका वाटते. स्कंदपुराणावर दुसरा संस्कार झालेला आहे, यांत शंकाच नाहीं. हा ग्रंथ एकत्र संपूर्ण मिळत नसून खंडात्मक असल्या- मुळे यांत अनेक स्थलमाहात्म्यें व इतर मजकूर घुसडून देण्यास मंडळीस सवड मिळणें साहजिक आहे. तथापि, अर्वाचीन भाग प्राचीन भागांतून नेहमीं निवडून काढण्यासारखाच असतो. हें पुराण सर्वपुराणांत मोठें व विविध आश्चर्यकारक कथांनी भरलेले आहे. याच्या संपूर्ण प्रतीचा शोध होणें जरूर आहे. मार्गे लिहिलेल्या १९ खंडांशिवाय खालील खंड या पुराणाचे भाग म्हणून आपणांस म्हणवून घेत असलेले आढळतातः- सह्याद्रिखंड, अर्बुदाचलखंड, कनकाद्रिखंड, काश्मीरखंड, कोसलखंड, गणेशखंड, उत्तरखंड, पुष्करखंड, बदरिकाखंड, भीमाखंड, भैरवखंड, मलयाचलखंड, मानसखंड, कालिकाखंड, श्रीमालखंड, पर्वतखंड, सेतुखंड,