पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नांव. पूर्वार्ध. उत्तरार्ध. रेणुकामाहात्म्य. चंद्रचूडमा. नागाव्हयमा. वरुणापुरमा. कामाक्षीमा. मांगीशमा. प्रकरण दुसरें. अध्याय. ६७ २१ ४० ८ ५ २ १२ १५६ श्लोकसंख्या. ३५५७ ११४२ १०२५ १४३ ७९ ५३ १३० ४५७ १३७ ६५८७ केदारखंड हें स्कंदपुराणांतीलच एक खंड असून यांत ३० अध्याय व सुमारें ३१२५ श्लोक आहेत. काशीखंड हैं स्कंदपुराणाचें १० वें खंड आहे, असे प्राकृतटीकाकार शिवदासगोमा कवि म्हणतो; अर्थात् हे५० खंडांपैकी १० वें हें उघड आहे. स्कंदपुराणांतील शिवरहस्यखंडांत व कूर्मपुराणांत आद्य श्रीशंकरों- चार्याचा उल्लेख आहे असें ऐकण्यांत आहे. असे असेल तर श्रीशंकरा- चार्याचा उल्लेख असलेले कांहीं भाग त्या त्या पुराणांत अगर पुराणभागांत जोडण्यांत आले असे म्हणावें लागेल. अमृतानुभवावरील टीकाकार शिवकल्याण हा आपल्या टीकेंत (शके १५५७ ) वारंवार सूतसंहितेंतील ब्रह्मगीतेचा उल्लेख करितो; व माधव मंत्र्यांनी १४ व्या शतकांत संपूर्ण सतसंहितेवर टीका केलेली आहे !.