पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. २ सूतसंहिता, ४ खंड, व ७६ अध्याय. ३ शांकरसंहिता, २१ खंड व २००० अध्याय. ४ वैष्णवीसंहिता, ५ ब्राम्ही संहिता, ५ सौरसंहिता, ३०० अध्याय. ( ३००० श्लोक ). ( ६०००० श्लोक ). यांत एकंदर सहा संहिता व पन्नास खंड आहेत असें म्हटलेले आहे:- स्कांद पुराणं संधाय पंचाशत्खंडमंडितम् । षड्डिधं संहिताभेदैः शिवधर्ममहार्णवम् ॥ १० ॥ पण वरील तीनच संहितांत मिळून ५० खंडांची भरती होते, हैं आश्चर्य नव्हे काय ? ... ...... ...... सनत्कुमारसंहितेंत ५० हजार श्लोक असून २५ खंड आहेत असें म्हटले आहे

– त्यांची नांवें. ( १ ) क्षेत्रखंड, ( २ ) तीर्थखंड, ( ३ )

काशीखंड, ( ४ ) सह्याद्रिखंड, ( ५ ) हिमाचलखंड, ( ६ ) मलया- चलखंड, ( ७ ) विंध्याद्रिखंड, ( ८ ) मोक्षखंड, (९) प्रभासखंड, ( १० ) पुष्करखंड, ( ११ ) नागरखंड, ( १२ ) नर्मदाखंड, (१३) श्रीशैलखंड, ( १४ ) अवंतीखंड, ( १५ ) गौरीखंड, ( १६ ) कुरु- क्षेत्रखंड, ( १७ ) केदारखंड, ( १८ ) हरिहरखंड, ( १९ ) सेतु- माहात्म्यखंड, ( २० ) कालिकाखंड, ( २१ ) व्रतोपाख्यानखंड, ( २२ ) नदीखंड, ( २३ ) धर्मखंड, ( २४ ) देशखंड, ( २५ ) वर्षखंड. स्कंदपुराणांतील निर्वाणखंडांत एक रामगीता आहे. तीवर उपेंद्रा- श्रमांचे शिष्य विश्वरूपभारती यांची अर्थसंदीपिका नामक टीका आहे. या टीकेच्या शेवटी खालील श्लोक आहेत:- - - उपेंद्रश्रीपदांभोजसभ्योत--( सद्यो ) तस्मृतिमालतः । विश्वरूपेण तीर्णः श्रीरामगीतामहांबुधिः ॥ १ ॥