पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण, भगवत्यां जगन्मातुरवतारकथाऽद्भुता । सौर्या सूर्यस्य महिमा गदितः पापनाशनः ॥ गाणेश्वर्या गणेशस्य चरितं च महेशितुः । इतीदं वामनं नाम पुराणं सुविचित्रितम् || पुलस्त्येन समाख्यानं नारदाय महात्मने । ततो नारदतः प्राप्तं व्यासेन सुमहात्मना || व्यासात्तु लब्धवान्वत्स ! तच्छिष्यो रोमहर्षणः । स चाख्यास्यति विप्रेभ्यो नैमिषयेभ्य एव च ॥ एवं परंपराप्राप्तं पुराणं वामनं शुभम् ॥ मस्यपुराणमतें याचें लक्षण असें आहे:-

-

त्रिविक्रमस्य माहात्म्यं अधिकृत्य चतुर्मुखः । त्रिवर्गमभ्यधात् तच्च वामनं परिकीर्तितम् ॥ पुराणं दशसाहस्रं कूर्मकल्पानुगे शिवम् । नारदसूचीप्रमाणेंच हल्लींही वामनपुराण मिळते; पण उत्तरभाग हल्लीं मिळत नाहीं. वेंकटेश्वरप्रेसमध्यें छापलेल्या वामनपुराणांतही नारदसूचीप्रमाणे १० हजार श्लोक नाहींत; यांतील श्लोकसमूह कसा नष्ट झाला असेल, हैं कांहीं समजत नाहीं. मत्स्यपुराणोक्त त्रिविक्रमचरित्र प्रचलित वामनपुराणांत असले तरी ब्रम्हद्वारा हें पुराण वर्णिले गेले नाही; तथापि हेंच वामनपुराण नारद- पुराणाची सूची रचण्यापूर्वी होतें असें वाटतें. विल्सन साहेबांस मिळालेला फक्त पूर्वभागच असावा; कारण त्याची श्लोकसंख्या त्यांनीं सुमारें ७ हजार दिलेली आहे. उत्तरभाग ४००० श्लोकांचा मिळतच नाहीं ! यामुळे हल्लीं श्लोकसंख्या कमी पडते. १४२