पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. प्रकरण १ लें. पुराणांविषयीं सामान्य विचार. पुराणें म्हणजे काय ? तीं किती प्राचीन आहेत ? वेदव्यासांनीं पुरा- णांविषयीं काय कामगिरी बजाविली ? पुराणे व्यासांनी कशासाठी संपादित केलीं ? पुराणांचा उद्देश काय ? पुराणांचें व्यासांपूर्वीचें स्वरूप व संख्या ह्रीं कशी होतीं ? नंतरचें स्वरूप कसें ? पुराणें व्यासांनी प्रचलित केली तशींच आज आहेत काय ? इत्यादि प्रश्नांविषयीं या प्रकरणांत सामान्य विचार करूं. पुराण म्हणजे काय ? पुरापरंपरां वक्ति पुराणं तेन वै स्मृतम् । निरुक्तिमस्य यो वेद सर्वपापैः प्रमुच्यते ॥ वायुपुराण, पद्म पु० १-२-५३. पूर्वीची परंपरा यांत सांगितलेली असते म्हणून यास पुराण म्हणतात. शुक्रनीति ( जिचा सध्याच्या भारतांत व चाणक्याच्या नीतिशास्त्रांत उल्लेख आहे ) या ग्रंथांत पुराण व इतिहास यांच्या व्याख्या अशा दिलेल्या आहेत- – प्राग्वृत्तकथनं चैकराजकृत्यमिषादितः । यस्मिन्स इतिहासः स्यात्पुरावृत्तः स एव हि ॥