पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ पुराणनिरीक्षण, ✔ चतुर्धा संस्थितं पुण्यं संहितानां प्रभेदतः ॥ ब्राह्मी, भागवती, सौरी, वैष्णवी च प्रकीर्तिता । चतस्रः संहिताः पुण्याः धर्मकामार्थमोक्षदाः ॥ इयं तु संहिता ब्राह्मी चतुर्वेदैश्च संमिता । भवंति षट् सहस्राणि श्लोकानामत्र संख्यया ॥ यत्र धर्मार्थकामानां मोक्षस्य च मुनीश्वराः माहात्म्यमखिलं ब्रह्म ज्ञायते परमेश्वराः ॥ कूर्मपुराण, ब्राह्मीसं० अ. १ ला, ३२-३५. वस्तुत: ही ब्राह्मीसंहिता वरीच प्राचीन व नारदपुराणसूचीच्या वेळीं होती तशीच राहिलेली असल्याप्रमाणे दिसतें. होत तांत्रिक विषय आहेत म्हणून कांहीं इला अर्वाचीन म्हणतां येत नाहीं, कारण शंकराचार्यांच्या वेळेस ६४ तंत्रेही प्रसिद्ध होतीं ! ते म्हणतातः- चतुःषष्ट्या तंत्रैः सकलमभिसंधाय भुवनम् ॥ आनंदलहरी. यावरून तंत्रे वरीच प्राचीन आहेत यांत शंकाच नाहीं; शिवाय, इ० पू० दुसऱ्या शतकांतील नागार्जुनानें आपल्या कक्षपुर्टीत खालील तंत्रांचा उल्लेख केलेला आहे:- शांभवे यामले शाक्ते मौले कौलेयडामरे । स्वच्छंदे लाकुले शैवे राजतंत्रेऽमृतेश्वरे ॥ ६ ॥ उड्डीशे वातुले तंत्रे उच्छिष्टे सिद्धशावरे । किंकिणी मेरुतंत्रे च काकचंडीश्वरीमते ॥ ७ ॥

  • नागार्जुनाच्या काळाविषयों माझें "भारतीयरसायनशास्त्र " १०९०

पहा.