पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. शाकिनीडाकिनीतंत्रे रौद्रेऽनुग्रहानग्रहे । कौतुके शक्तितंत्रे च निराकारगुणोत्तरे ॥ ८ ॥ हरमेखलके तंत्रे इंद्रजाले रसावे । आथर्वणे महावेदे चार्वाके गारुडेऽपि च ॥ ९ ॥ इत्येतदागमोक्तं च बक्त्राद्वक्त्रेण यच्छ्रुतम् । तत्सर्वं तु समुध्दृत्य दनो घृतमिवादरात् ॥ १० ॥ यावरून तंत्र ग्रंथ अर्वाचीन आहेत ही समजूत चुकीची आहे. या पुराणांतील ब्राह्मी संहितेंतील ईश्वरगीता व व्यासगीता यांतील उतारे श्रीशंकराचार्यांनी आपल्या विष्णुसहस्रनामभाष्य व सनत्सुजाती- यभाष्य यांत घेतलेले आहेत. असो. अगदी निर्भेळ अशी पुराणसंहिता सुमारें इ० स० ५०० पासून कोणती राहिली असेल तर ती ह्या पुराणाची ब्राह्मीसंहिता होय ! मत्स्यपुराण, १६ वें. मत्स्यपुराणानें आपलें लक्षण असें दिलेले आहे:- श्रुतीनां यत्र कल्पादौ प्रवृत्त्यर्थं जनार्दनः । मत्स्यरूपेण मनवे नरसिंहस्य वर्णनम् || अधिकृत्याब्रवीत् सत्यकल्पवृत्तं मुनीश्वराः । तन्मात्स्यमिति जानीध्वं सहस्राणि चतुर्दश || अध्याय, ५०-५३. नारदपुराणांत याची सूची याप्रमाणे दिलेली आहे:- अथ मात्स्यं पुराणं ते प्रवक्ष्ये द्विजसत्तम ! यत्रोक्तं सत्यकल्पानां वृत्तं संक्षिप्य भूतले ॥