पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. ● विल्सन यांस गरुडपुराणाच्या ३ प्रति पहाण्यास मिळाल्या; पण त्या तिन्ही प्रतीत सात हजारांवर श्लोक नव्हते. तसेंच, कलकत्त्यास छापलेल्या गरुडपुराणांत याची लोकसंख्या याप्रमाणे दिलेली आहे कीं:- अष्टौ लोकसहस्राणि तथा चाष्टौ शतानि च । पुराणं गारुडं व्यासः पुराऽसौ माऽब्रवीदिदम् || अ. १-३५. यांत श्लोकसंख्या ८८०० दिलेली आहे !!! वेंकटेश्वरच्या यादीत मात्र १९००० श्लोकांचे मोठें गरुडपुराण आहे !!! तें मला अजून तपासून पाहणें झालें नाहीं ! ब्रह्मांडपुराण, १८ वें. प्रो. विल्सन, राजा राजेंद्रलाल मिल व डॉ० भांडारकर वगैरे विद्वान् लोक मूळ ब्रह्मांडपुराण बुडालेलें आहे, असें मानतात. मत्स्यपुराणमतें ब्रह्मांडाचें लक्षण असे आहे कीः— ब्रह्मा ब्रह्मांडमाहात्म्यं अधिकृत्याऽब्रवीत्पुनः । तच्च द्वादशसाहस्रं ब्रह्मांडं द्विशताधिकम् ॥ ५४ ॥ भविष्याणां च कल्पानां श्रूयते यत्र विस्वरः । तद्ब्रह्मांडपुराणं च ब्रह्मणा समुदाहृतम् ॥ ५५ ॥ अ. ५३. शिवपुराणाच्या उत्तरखंडांत याचें लक्षण असे आहे:- ब्रह्मांड चरितोक्तत्वाद्ब्रह्मांडं परिकीर्तितम् । शैवमहापुराणाच्या वायुसंहितेच्या ११ व्या अध्यायांत म्हटले आहे की :- ब्रह्मांडं चातिपुण्योऽयं पुराणानामनुक्रमः । नारदपुराणांत याची सूची अशी दिलेली आहे:- --