पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. भ्रमतो धर्मचक्रस्य यत्र नेमिरशीर्यत । कर्मणा तेन विख्यातं नैमिषं मुनिपूजितम् || ( सोसाइटीचे ) वायु पु. २ अ. ७ श्लोक. पण श्रीधरोद्धृत श्लोकच वंगवासी कार्यालयांत प्रसिद्ध झालेल्या शिव- पुराणाच्या वायुसंहितेंत जशाचा तसा आहे ( वायुसंहिता, पूर्वभाग, अ. २-८८ ). या कारणांमुळे पं. ज्वालाप्रसाद यांचें मत असें आहे की, शिवपुराणांतील वायुसंहिता हीच मस्त्योक्त वायुपुराण असून हल्लीं वायुपुराण म्हणून प्रसिद्ध झालेले ग्रंथ ब्रह्मांडपुराण आहेत !! सोसाइटीच्या वायुपुराणाबरोबर गयामाहात्म्य जें प्रसिद्ध केलं तें मात्र ब्रह्मांडाचा भाग नव्हे असे त्यांचें मत आहे. १६३ ब्रह्मांडपुराण इ० स० च्या पांचव्या शतकांत यवद्वीपांत नेलें गेले होते; अजून तेंच ब्रह्मांडपुराण वालि ( बाल ) द्वीपांत कविभाषेत भाषांतरित होऊन उपलब्ध आहे. प्रचलित ब्रह्मांडपुराणाशी त्याची तुलना करून पाहिली तर असे आढळून येतें कीं, भविष्यराजवर्णनाशिवाय बाकीचे सर्व भाग प्रस्तुतच्या ब्रह्मांडासारखेच आहेत ! ! ! यावरून पांचव्या शतकानंतरच यांत भविष्यराजवर्णन हिंदुस्थानांत जोडण्यांत आलें, बलिद्वीपांत हैं पुराण जाण्याच्या पूर्वी कांहीं त्यांत हैं नव्हतें हैं उघड होतें. यावरून यांत ' भविष्यराजवर्णन ' आहे, असें म्हणणारी नारदसूची पांचव्या शतकानंतर त्या पुराणांत हैं प्रकरण घातल्या- नंतर तयार केली हेंही पण सिद्ध होतें. म्हणजे या सूचीचा जो आम्ही ५००-६०० इ० स० हा काळ ठरविलेला आहे तो बरोबर ठरतो. भविष्याचा भाग सोडून बाकीचा भाग सर्व इ० स० ४०० इतका तरी सहज प्राचीन आहे ! ! ! इतकें जरी वर पं. ज्वालाप्रसाद यांच्या मतें, प्रचलित वायूचें ब्रह्मां- डाशीं ऐक्य आम्ही प्रदर्शित केले, तरी हें ऐक्य कबूल करण्यांत एक मोठी