पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. गोम आड येते; — —ती ही कीं, श्रीशंकराचार्यांनी ब्रह्मांडपुराणांतील कावषेयगीतेंतील उतारे घेतलेले आहेत ( विष्णुस नाम व सनत्सु- जातीयभाष्यें पहा ). ही कावषेयगीता पं. ज्वा. प्र. च्या ब्रह्मांडांत म्ह. प्रचलित वायुपुराणांत नाहीं. म्हणून हें वायुपुराण ( चतुष्पाद ) असून ब्रह्मांड हल्ली लुप्त झालेले आहे, असेच शेवटीं वाटतें. नाहीपेक्षां, शंकराचार्योंक्त कावषेयगीता ब्रह्मांडांत दाखवावी लागेल ! विल्सन यांस मिळालेल्या ब्रह्मांडपुराणाचा पूर्वार्ध* ( तो मोठाच होता ) प्रचलित वायुपुराणच होता; पण दुसरा भाग म्ह. उत्तरार्ध मात्र वायु- पुराणाचा कोणताही भाग नव्हता. या दुसऱ्या भागांतील मजकुराचा नारदोक्त ब्रह्मांडपुराणाशीं बिलकूल मेळ नाहीं ! वायु व ब्रह्मांडपुराणाचा कांहीं तरी निकट संबंध दिसतो एवढे मात्र खरें ! ! ! मग प्रचलित वायु ब्रह्मांडच असो किंवा त्याचा पूर्वभाग असो ! मग, कावषेयगीता कशांत आहे ? - उपपुराणें. सूतसंहितेंत त्यांविषयीं खालील माहिती मिळतेः- - अन्यान्युपपुराणानि मुनिभिः कीर्तितानि तु । आद्यं सनत्कुमारेण प्रोक्तं वेदविदां वराः ॥ द्वितीयं नारसिंहाख्यं तृतीयं नांदमेव च । चतुर्थ शिवधर्माख्यं दौर्वासं पंचमं विदुः ।

  • पूर्वार्धात १२४ अध्याय व उत्तरार्धात ७८ अध्याय होते; संख्या

सुमारें १२२०० होती !