पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. १६७ १ आदिपुराण, २ मुद्गलपुराण, ३ गणेशपुराण, ४ देवीपुराण, ५ देवी- भागवतपुराण इ०. देवीभागवत इ. स. ११०० च्या सुमारास होतें, हें मागें दाखविलेलें आहे; यामुळे इ. स. ४०० ते ११०० च्या दरम्यान हीं उपपुराणे झाली असावीत. उपपुराणांपैकी आदिपुराण, आदित्यपुराण, कालिकापुराण, देवीपुराण, नंदीपुराण, नृसिंहपुराण, शिवधर्मोत्तर इतक्यांचा उल्लेख अप- रार्कानें केलेला आहे. ( १२ वें शतक. ) तसेंच शंकराचार्यांनी उपपु- राणांपैकी नृसिंहपुराणाचा उतारा घेतलेला आहे.