पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण - उत्तरार्ध. - प्रस्तावना. या पुस्तकाच्या पूर्वार्धाविषयीं नव्या व जुन्या मतांच्या लोकांत मतभेद होण्याचे कारणच नाहीं. उत्तरार्धीत मात्र मतभेद होण्यास जागा आहे. सारा उत्तरार्ध चिकित्सक व शोधकबुद्धीने लिहिलेला आहे. त्यांत पौरा- णिक व इतर प्रमाणांवरून प्राचीन भरतखंडाचा इतिहास व कालगणना ही ठरवून भारतीयांवर इतिहासशून्यतेचा जो अति मोठा आरोप आहे, तो घालवून टाकण्याचा यत्न केलेला आहे. त्याकरितां, पूर्वी पौराणिक कालगणना कशी होती, व ती युगमन्वंतरपद्धतीनें कशी ठरवितां येते, हें दाखवून त्या पद्धतीप्रमाणें अनेक गोष्टींचे काळ दिलेले आहेत. भारतीय युद्ध, महानंद व चंद्रगुत यांचे प्रथम काळ ठरवून मग प्राचीन इति- हासांतील राम, परशुराम, ययाति, मांधाता इत्यादि व्यक्तींचे काळ ठर विलेले आहेत. पुढे ह्या कल्पांतील मुख्य मुख्य राजांच्या हकीकतींचा व तत्कालीन इतिहासाचा विचार करून अनेक ऋषींचा व ग्रंथकारांचा काळ ठरविलेला आहे. भारतीय कालगणना व इतिहास यांची याप्रमाणे इ०पू० ३१०२ पासून संगति लाविल्यानंतर प्राचीन पौराणिक भूगोलाविषयों थोडासा विचार रा. राजवाडे व मि. विलफोर्ड यांच्यामतें केलेला आहे. नंतर पूर्वकल्पांतील कांहीं गोष्टींविषयीं माझे विचार प्रकट केलेले आहेत. उत्तरार्धातील हे विषय जुन्या मताच्या लोकांत विस्मय उत्पन्न करणारे आहेत, किंबहुना त्यांच्या फार मोठ्या युगांच्या कल्पनांस जबरदस्त धक्का देणारेही आहेत; पण केवळ एवढ्यामुळे त्यांनी या भागाचें वाचन सोडून देऊं नये. स्वा मनूपासून चंद्रगुप्तापर्यंत पिढ्या साऱ्या १५३-१५४ इतक्याच आहेत. प्रत्येक पिढीला २०-२२ वर्षे धरिलीं तरी ( चंद्र-