पुराणनिरीक्षण. चतुर्लक्षप्रमाणेन द्वापरे द्वापरे प्रभुः । तदष्टादशधा कृत्वा भूर्लोकेऽस्मिन्प्रकाश्यते ॥ अ. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् । अनंतरं च वक्त्रेभ्यो वेदास्तस्य विनिर्गताः || ब्रह्मांडपु. या उताऱ्यांवरून खालील पौराणिक परंपरा कळून येतीलः-- (१) पुराण वेदांहूनही ( म्ह० वेदसंहितांहूनही ) प्राचीन आहे. (२) वेदांहून प्राचीन असें पुराण कल्पांतरींचें असून तेव्हां तें एकच होतें. (३) त्याची संख्या शतकोटी होती. 10 11 (४) तें लुप्त होत चाललें म्हणून व्यासांनी त्यांतील मजकुराचा संक्षेप करून चार लक्षांच्या अशा अठरा पुराणसंहिता केल्या. हे पौराणिक सिद्धांत कितपत बरोबर आहेत हैं आपण पाहूं. आपणांस एक खूण मिळाली आहे की, व्यासांनी १८ पुराणें बनविलीं; त्यापूर्वी वेद जसा एकच होता तशींच पुराणेंही अनेक नसून तें एकच होतें. अर्थात् वेदांत एकवचनी पुराणच येणें शक्य आहे. कांहीं श्रुतींची अथवा ग्रंथांची रचना जर व्यासांनंतरची असेल तर अनेकवचनीं पुराणें आढळ- तील. ही एक मोठीच खूण- आपणांस सांपडली म्हणावयाची ! वैदिक ग्रंथांत पुराणोल्लेख. अथर्ववेदांत ( ११-७-२४ ) म्हटले आहे की:-- ऋचः सामानि छंदांसि पुराणं यजुषा सह । उच्छिष्टाजज्ञिरे सर्वे दिवि देवा दिविश्रिताः || गोपथांत ( पूर्वभाग २ प्र० ) म्हटले आहे कींः-- एवमिमे सर्वे वेदा निर्मिता: सकल्पा: सरहस्याः सब्राह्मणाः सोपनिषत्काः सेतिहासाः सान्वयाख्याताः सपुराणाः सस्वराः । (इत्यादि).
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही