पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. ( " महाभारत ' व " तुम्ही लिहिलेले लेख-मराठी व इंग्रजी समग्र वाचले. एकंदर लेखां- तील तुम्हीं मिळविलेली माहिती महत्त्वाची असून, त्याजवरून तुम्हीं जी कित्येक अनुमानें काढिलीं आहेत ती बरोबर आहेत; परंतु भारतीय युद्धा- चा तुम्हीं ठरविलेला काळ माझ्या मतें बरोबर नाही. याचें मुख्य कारण असें कीं, तुम्ही पौराणिक दंतकथांवर पूर्ण विश्वास ठेवितां हें होय. पौराणिक दंतकथा - निदान प्राचीन काळच्या संबंधानें तरी अगदर्दी अवि- श्वनीय आहेत, असें सप्रमाण सिद्ध करितां येईल. याशिवाय, भारतीय युद्धाचा काळ इ. पू. १२६३ घेतल्यानें इतर किती घोटाळे उत्पन्न होतात याची तुम्हांस कल्पना नाही. तुमचे लेख समग्र छापले जाऊन एकत्र करितां येतील तर त्यांपासून बराच फायदा होईल. तुमच्या लेखांस सप्र- माण उत्तर देण्याची माझी इच्छा आहे*. रा. ब. चिंतामण विनायक वैद्य. १७९ " रामायण यांवर इंग्रजी ग्रंथ लिहिणारे. )

  • प्राचीन पौराणिक परंपरा कशा विश्वसनीय आहेत व अर्वाचीन पौराणिक परं-

परा कशा अग्राह्य आहेत, हें या पुस्तकांत भी सविस्तरपणे दाखविलेलें आहे, असे मला वाटतें. मी तरी सर्वच पौराणिक परंपरा विश्वसनीय कोठें मानता? तसेंच, भिन्न भिन्न काळच्या पौराणिकांत काय काय समज होते व ते तसे समज त्यांनी कसकसे करून घेतले, व या एकंदर समाजांत सर्वात प्राचीन ऐतिहासिक समज कोणती, हेही मी दाखविले आहे. ( ग्रंथकर्ता.)