पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३ रें. पौराणिक कालगणना. भारतीय युद्धाचा काळ. मी गेल्या ४/५ वर्षांपासून पौराणिक कालगणनेविषयीं विचार करीत आहे. मद्रासेकडील प्रो. रंगाचार्य यांचा युगांवरील निबंध व रा. आय्यर यांचें The Chronology of Ancient India हें पुस्तक वाचून भारतीय युद्धाचा काळ व एकंदर पौराणिक गोष्टींचा काळ कांहीं तरी स्पष्ट रीत्या ठरविणें शक्य आहे, असे मला वाटू लागले. त्यानंतर मन्वं- तरें व युगें यांचा मला उलगडा झाला; पण अद्यापि पूर्णपणें पौराणिक कालगणनेचा उलगडा अर्वाचीन काळापर्यंत झालेला नव्हता; एतदर्थ हा विषय लिहून काढण्याची गडबड केली नव्हती. अलीकडे -- माझी मन्वं- तराची कल्पना परिणत होत असतेवेळींच--म्हैसूरचे पंडित रुद्रपट्टण शाम- शास्त्री यांचें 'गवामयनं' या नांवाचें पुस्तक प्रसिद्ध झाले; त्यांत त्यांनीं असे प्रतिपादन केलेले आहे कीं, मनूपासून भारतीय युद्धापर्यंत वैदिक ऋषींनीं एक कालगणना चालू ठेविली होती व ती भारतीय युद्धामुळे पुढें बुडून गेली; यावरून मला जास्तच उमेद आली व आपल्या लोकांना कालगणनेची ( Chronology ) कल्पना होती हैं जें माझें पौराणिक ग्रंथ वाचून मत झालेले होते, त्यास दुजोरा मिळाला. अलीकडे वैदिक व पौराणिक ऋषींप्रमाणेंच, अर्वाचीन लेखकांस देखील कालगणनेची थोडी- बहुत कल्पना होती, असे आढळून आलेले आहे. या सर्व कल्पना माझे मनांत कशा परिगण होत गेल्या, याची सविस्तर हकीकत आतां लिहून ठेवण्याची वेळ आलेली आहे, असे मला वाटू लागले. याकरितां मी ही