पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. प्रकरणें लिहीत आहे. प्रथम मी वैदिक ऋषि, पौराणिक ऋषि व अर्वा चीन लेखक या शब्दांनी काय समजतों, हैं मला स्पष्टपणें सांगितले पाहिजे. वैदिक ऋषि या शब्दानें मी वैवस्वतमनूच्या काळापासून भारतीय युद्धा- पर्यंतच्या सर्व ऋषींचा समावेश करितों. पौराणिक ऋषि म्हणजे भारतीय युद्धापासून क्षत्रियकुळाचा अंत होऊन नंदांचें साम्राज्य सुरू होईपर्यंतच्या दरम्यानच्या काळांतील ऋषि होत. तेथून पुढील लेखकांस मी अर्वाचीन लेखकांत गणतों. या तिन्ही प्रकारच्या लोकांना कालगणनेची कल्पना होती, हेंच मला या लेखमालिकेत दाखवावयाचें आहे. १८१ भारतीय प्राचीन इतिहासांत ज्याचा काळ थोडाबहुत ठरलेला आहे, तो राजा म्हणजे चंद्रगुप्त होय. याचा काळ इ० पू० ३१२ ते ३२५ पर्यंत युरोपीय लोक समजतात. तेव्हां याचा काळ तूर्त युरोपीय लोकांच्या मताप्रमाणेच धरून त्यामागील काळासंबंधानें विवेचन करूं. भारतीय युद्धा- पासून चंद्रगुप्तापर्यंत किती वर्षे झाली, या प्रश्नाचा आपण पौराणिक ग्रंथांच्या आधारें विचार करूं. चंद्रगुप्तापासून पुढील इतिहास बौद्ध व जैन ग्रंथादिकांच्या आधारेंही ठरवितां येतो व पुढें ठरवूं; इतकेंच नव्हे, तर चंद्र- गुप्ताचा राज्याभिषेककाळही नक्की ठरवितां येतो. त्याच प्रमाणे बौद्ध व जैन ग्रंथांवरून घ्यावयाची असल्यामुळे ती नंतर देऊन चंद्रगुप्तापर्यंत किती वर्षे झार्ली, याबद्दल पौराणिकांचें काय मत आहे हे पाहूं. वायु, मत्स्य, विष्णु व भागवत या चार पुराणांमध्यें भविष्यत्कालच्या राजांविषयी माहिती मिळते; त्यांत सर्वांत प्राचीनपरंपरा डॉ. भांडारकर यांनी आपल्या दक्षिणच्या इतिहासांत ठरविल्याप्रमाणें वायुपुराणांत मिळते. भविष्यत्कालच्या राजांची माहिती इतर पुराणांनी वायुपुराणा- वरूनच घेतली असें मानण्यास बळकट प्रमाणें आहेत. वायु, मत्स्य, विष्णु व भागवत यांचा भविष्याच्या भागाबद्दल काळाचा अनुक्रम आहे; म्हणजे