पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. वायुपुराणांतील भविष्य सर्वात प्राचीनतम असून बाकीच्या पुराणांचें क्रमानें अर्वाचीनतर आहे; एवढ्या प्रस्तावनेवरून वाचकांच्या लक्षांत येई लच कीं, पुढील विवेचनांत वायुपुराणालाच महत्त्व दिलेलं आहे; व बाकीच्या पुराणांचा पुरावा अनुषंगाने घेतलेला आहे. १८२ वायुपुराण ( आनंदाश्रमप्रत, अ. ९९ व कलकत्ताप्रत, अ. ३७ ) मध्यें लिहिलेले आहे की, महादेवाभिषेकात्तु जन्म यावत्परीक्षितः । एतद्वर्ष-( एकवर्ष ) सहस्रं तु, ज्ञेयं पंचाशदुत्तरम् || दुसऱ्या ओळीचे एतद्वर्ष ० एक वर्ष ० व एकवर्ष • असे तीन पाठभेद आहेत. या श्लोकाचा अर्थ असा- महादेवाच्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मापर्यंत १००० ( किंवा १००१ ) वर्षे झाली व ती ५० नीं अधिक होतीं. (It was 1000 years less by fifty ) Wilson's विष्णुपुराण, BK IV, 25, P. 230. पहिल्या ओळीच्या अर्थाबद्दल मतभेद असणें शक्यच नाहीं; दुसऱ्या ओळीच्या अर्थाबद्दलच तो आहे. तो असाः- ( १ ) " ह्रीं १०५० वर्षे होतात, " असा एक अर्थ आहे. ( २ " हीं १००० वर्षे होतात, पण त्यांत ५० वर्षे अधिक आहेत, " म्हणजे ९५० वर्षेच होतात, असा दुसरा अर्थ आहे. ( ३ ) तिसरा अर्थ दुसऱ्यास धरूनच आहे. फक्त पाठभेद ' एकवर्ष सहस्र ' असा घेऊन ते, " हीं १००१ वर्षे होतात, पण त्यांत ५० वर्षे अधिक आहेत, " असा अर्थ करितात; व त्याप्रमाणे त्यांच्या मतें हा अवकाश ९५१ वर्षाचा होतो. विल्सनसाहेबांनी दुसऱ्या व तिसऱ्या तऱ्हेचाच अर्थ घेतलेला आहे. एक हजार पन्नास ' असा अर्थ न घेतां, ' एक हजार पण ते पन्ना- <