पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. ण्यापूर्वी आपण या महत्त्वाच्या श्लोकाचे इतर पुराणांनी कते अर्थ केलेले आहेत तें पाहूं. १८४ मत्स्यपुराणांत हा श्लोक असा आहे:-- महापद्माभिषेकात्तु यावज्जन्म परीक्षितः । एकवर्षसहस्रं तु ज्ञेयं पंचाशदुत्तरम् ॥ अ. २७३-३५. येथेही दुसऱ्या ओळीचे ' एतद्वर्ष०, ' ' एकवर्ष ' व ' एकं वर्ष ' असे पाठभेद आहेत. यांत वायुपुराण व मत्स्यपुराण यांचा द्वितीय श्लो- कार्ध सारखाच आहे व त्याचे पाठभेदही सारखेच आहेत. प्रथमाधीवरून असे दिसतें कीं, वायुपुराणांतील ' महादेव ' म्हणजे ' महापद्म नंद ' असा मत्स्यपुराणानें अर्थ केला. १ ८ पण हा अर्थ कितपत बरोबर आहे हैं पुढें कळेलच. तू व भागवतपुराणांचे वरील श्लोकांचे अर्थ पाहूं:-- विष्णुपुराण लिहितें की:- यावरपरीक्षितो जन्म यावन्नंदाभिषेचनम् । एतद्वर्षसहस्रन्तु ज्ञेयं पंचदशोत्तरम् ।। ४- २४ येथें परीक्षिताच्या जन्मापासून नंदाच्या अभिषेकापर्यंत १००० वर्षे अधिक १५ झार्ली असें म्हटले आहै, मत्स्यपुराणानें 'महादेव ' शब्दानें जो ' महापद्मनंदा ' चा अर्थ घेतला तोच विष्णुपुराणानें कायम केला; द्वितीयात मात्र ' ज्ञेयं पंचाशदुत्तरम् ' या पाठाच्या ठिकाणी 'ज्ञेयं पंचदशोत्तरं ' असा तेथें पाठभेद आढळतो. पण हा लेखकप्रमाद असावा असे वाटतें. कारण वायु व मत्स्य यांतून ' ज्ञेयं पंचाशदुत्तरं ' असे स्पष्ट पाठभेद आहेत. तेव्हां विष्णुपुराणाला ' पंचदशोत्तरं ' अशी स्वतंत्र परं- परा असेल असे वाटत नाहीं. हा फक्त कालांतराचा लेखकप्रमाद असावा.