प्रकरण पहिलें. १. अध्वर्युस्तार्क्ष्यो वै पश्यतो राजेत्याह । तानुपदिशति पुराणं | वेदः सोऽयमिति । किंचित्पुराणमाचक्षीत । एवमेवाध्वर्युः संप्रेष्यति न प्रक्रमान् जुहोति । अथ दशमहन् । शतपथ ब्रा. १३-४-३१३. यांत ' पुराण हें वेदतुल्य असून तें अध्वर्यु दहावे दिवर्शी राजास सांगतो' असे म्हटले आहे. t एवं वाअरेऽस्य महतो भूतस्य निःश्वसितं एतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथवगिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषदः ॥ बृहदारण्यक, २-४-११. यांत चारी वेदांप्रमाणेच इतिहास व पुराण देखील ' महाभूत ' जें परमेश्वर त्याच्या निःश्वासापासून उत्पन्न झार्ली असे म्हटले आहे. स होवाच ऋग्वेदं भगवोऽध्येमि यजुर्वेदं सामवेदमाथर्वणं चतुर्थ मितिहासपुराणं पंचमं वेदानां वेदं || छांदोग्य उ. यांत ' इतिहासपुराणं' यांस पांचवा वेद म्हटले आहे. एवं विद्वान्बाकोवाक्यमितिहास: पुराणमित्यहरह: स्वाध्यायम- घीते त एनं तृप्तास्तर्पयंति सर्वैः कामैः सर्वैगैः ॥ शतपथ ब्रा. ११-५-७-९. यांत वाकोवाक्य, इतिहास, पुराण इत्यादि स्वाध्याय जो पढतो तो स्वतः तृप्त होतो व देवांसही संतुष्ट करितो असे म्हटले आहे. वरील सर्व उल्लेखांत पुराणं शब्द एकवचनी आलेला आहे; यावरून वैदिक वाङ्मयाच्या काळीं पुराणें अनेक नव्हतीं, एकच होतें, हा पौरा- णिक सिद्धांत बरोबरच आहे असे म्हणावें लागतें. आतां त्यावेळी त्याची संख्या किती होती हैं मात्र वेदग्रंथांवरून कळत नाहीं यास इलाज नाहीं.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही