१८८ पुराणनिरीक्षण. पासून आंध्रांच्या अखेरपर्यंत ८३६ वर्षे झालीं; असा एकूण १६७२ वर्षांचा अवकाश गेला, याबद्दल दोन्ही पुराणांचें ऐकमत्य आहे. तेव्हां ह्या परंपरा प्राचीनतर दिसतात. आंध्रांचा अखेर इ. स. ३०० च्या सुमारास धरिला तर परीक्षितीचा काळ सुमारें इ. स. १३०० हा येईल. आतां परीक्षितीच्या वेळी सप्तर्षि मघांत होते, असा उल्लेख आहे. मघा दहावें नक्षत्र आहे. आंध्रांच्या शेवटी २४ वें नक्षत्र असेल असे म्हटलेलें आहे. २४००-९००=१५०० वर्षे हे अंतर परीक्षित व आंध्र यांच्यांत पडतें; तेव्हां या सप्तर्षीच्या परिभाषेनेंही परीक्षितीच्या काळापासून आंध्रां- च्या अखेरपर्यंत १५००/१६०० वर्षे झालीं असें सिद्ध होतें. सप्तर्षीना वास्तविक गति नाहीं हें सिद्धच आहे. तेव्हां इतर प्रमाणांनीं वर्षसंख्या कळली तर सप्तर्षि- भाषेत ती सांगतां येते हैं उघड आहे. १५००/१६०० वर्षे झाली तर १५/१६ नक्षत्रें सप्तर्षि पुढे गेले, असें मानण्यांत येतें; असो. याच न्यायानें प्रतीप व परीक्षित यांच्यांत २७००-२४००=३०० वर्षांचें अंतर असावे असे वाटतें. आतां वायुपुराणांत, महादेवाच्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मा- पर्यंत ९५०-५१ वर्षे झाली, असे सांगून, त्यास प्रमाण म्हणून, ( परी- क्षितीच्या अभिषेकापासून ) महापद्मापर्यंत ८३६ वर्षे झालीं, ही जुनी परं- परा दिलेली आहे. या दोन्ही परंपरांचा काय संबंध आहे ? मत्स्यपुराणानें तर ' महादेव ' म्हणजे ' महापद्मनंद' च ठरवून टाकला व इतर पुरा णांनी त्याचेंच अनुकरण केलें; पण मत्स्यपुराणाच्या असे कसें लक्षांत आले नाही की, एकदां आपण परीक्षितीपासून महापद्मापर्यंत ९५०/९५१ वर्षे झाली म्हणतों; व लगेच खार्ली ८३६ वर्षे झाली म्हणतों ! पुढील पुराणांस ८३६ वर्षीच्या परंपरेची कल्पना व आठवणही नाहीं. मत्स्य-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही