पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० प. अ. पासून म. अ. पर्यंत नंदाचा काळ ( पुराणमतें ) पुराणानिरीक्षण. } ( १५) ८३६ १०० चंद्रगुप्ताचा अभिषेक ९५१ याप्रमाणे वायुपुराणकर्त्यांच्या मतें भारतीय युद्धापासून ९५१ वर्षानंतर " महादेवा' चा म्हणजे चंद्रगुप्ताचा अभिषेक झाला. वायुपुराणकर्त्यानें ' महादेव ' पदानें चंद्रगुत घेतलेला आहे हे सिद्ध होतें. पण हें सिद्ध होण्यास ९५१ असाच अर्थ श्लोकाचा घेतला पाहिजे, * म्हणजेच वायुपुराणांतील पहिल्या २ श्लोकांची संगति लागते. एरवीं ८३६ आंकड्यावरून ९५१ या काळाची उपयत्ति कशी लागणार ? वायुपुराणानें तर पहिल्या विधानाचें प्रमाण म्हणून दुसऱ्या श्लोकाची प्राचीन परंपरा दिलेली आहे. तेव्हां या श्लोकांची सांगड असलीच पाहिजे हैं उघड होते; वही सांगड असे अर्थ केल्यानेंच उत्पन्न होते. ( १ ) परीक्षितीच्या जन्मापासून महादेवाच्या म्ह. चंद्रगुप्ताच्या अभि षेकापर्यंत ९५१ वर्षे झाली. ( २ ) याचें कारण असें कीं, परीक्षितीच्या अभिषेकापासून महापद्म- नंदाच्या अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे झाली. ( यांत नंदाची १०० व परीक्षितीचीं अभिषेकापूर्वीचीं १५ वर्षे मिळविलीं की ९५१ वर्षे होतात. ) यावरून, वायुपुराणाच्या भविष्यद्भागकर्त्याचें मत काय होतें हैं कळून " अशा तऱ्हेनें अर्थ करण्याची संस्कृतमध्ये पद्धत आहे. श्रीशंकराचार्या चाही काळ देतांना एका कवीने असे लिहिले आहे. 'चतुःसहस्रे द्विशतोत्तरे गते । तिष्येऽवतीर्णो भुवि शंकरार्यः ॥ ' म्ह. २०० वर्षांनी अधिक अशीं ४००० वर्षे म्ह. ३८०० वर्षे कलीचीं गेली असतां या जगांत शंकराचार्य अवतीर्ण झाले ।