पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. पर्व इ० प्राचीन जैन ग्रंथांवरून ऐतिहासिक परंपरा दिलेल्या आहेत. त्या परंपरांवरून खालील माहिती कळते:- १९२ - " जैनांचे शेवटचे तीर्थंकर महावीर वर्धमान हे विक्रमापूर्वी ४७० वर्षी निर्वाण पावले. त्याच वर्षी त्याच रात्रीं, अवंतीचा प्रद्योत राजा (चंड- प्रद्योत ) मरण पावला. नंतर त्याचा मुलगा पालक उज्जनीस राज्य करूं लागला. " महावीरांच्या निर्वाणानंतर ६० वर्षांनी पाटलीपुत्रांत राज्य करीत असलेला कूणिकाचा पुत्र उदायी याचा खून झाला. “ यानंतर १५५ वर्षांनीं व निर्वाणापासून २१५ वर्षांनी चंद्रगुप्त राज्यारूढ झाला. " येथें मेरुतुंगानें दोन मतें दिली आहेत. एका पूर्वीच्या परिशिष्टपर्वा- वरून, त्यांनी चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक उदायीच्या मरणानंतर १५५ वर्षांनीं म्हणजे निर्वाणापासून २१५ वर्षीन झाला असें लिहिलेले आहे; पण हेमचंद्राच्या परिशिष्टपर्वावरून पहातां, मेरुतुंगाचार्योस चंद्रगुप्ताचा अभिषेक निर्वाणानंतर १५५ हाच द्यावा लागला; पण पहिलेंच मत खरें आहे. यास प्रमाण, चंद्रगुप्ताच्या काळाविषयीं दुसरी एक जैन परंपरा असल्याची जेकोबी " यांनी दिलेली आहे. ती अशी कीं, विक्रमापूर्वी २५५ वर्षे चंद्रगुप्ताचा अभिषेक झाला. जुन्या परिशिष्टावरून मेरुतुं - गानें दिलेली परंपरा व जेकोबींनी दिलेली चंद्रगुप्तकाळाची परंपरा या दोन्हीवरून पाहतां चंद्रगुप्ताचा राज्याभिषेककाळ निर्वाणानंतर २१५ व विक्रमापूर्वी २५५ वर्षे झाला हेंच बरोबर दिसतें. यावरून खालील काळ ठरतात:-

  • हेमचंद्राचें परिशिष्टपर्व, प्रस्तावना पहा.