प्रकरण तिसरें. एकंदां, एका राजाचें राज्य खालसा करून त्यास हद्दपार केले असतां तेथें विदेशांतही त्यास गांठवून उदायीनें ठार करविलें तेव्हां, त्या राजाच्या पळून गेलेल्या पुत्रानें — जैन यतीचा वेष घेऊन — रात्री राजाचा खून केला. राजधानीत रात्री एकाएकी एका जैन यतीनें खून केला, अशी लोकांची समजूत झाली; परंतु हा राजकीय वध होता; याप्रमाणे खि० पू० ४६७ वर्षी उदायी याचा अंत झाला. - वायुपुराणांत या उदायीविषय असा उल्लेख आहे:- उदायी भविता यस्मात् त्रयस्त्रिंशत्समा नृपः । स वै पुरवरं राजा पृथिव्यां कुसुमाव्हयम् । गंगाया दक्षिणे कूले चतुर्थेऽब्दे करिष्यति ॥ वायुपुराण, अ. ९९-३१९. १९५ मत्स्यपुराणांत फक्त याचें राज्य ३३ वर्षांचें होतें, एवढेंच दिलेलें आहे. वृद्धगर्गाच्या बृहद्गार्गीसंहितेंतही उदधीविषयीं असे लिहिले आहे कीं, ततः कलियुगे राजा शिशुनागात्मजो बली । उदधी नाम धर्मात्मा पृथिव्यां प्रथितो गुणैः ।। गंगातीरे स राजर्षि: दक्षिणे स महावरे । स्थापयन्नगरं रम्यं पुष्पारामजनाकुलम् । तेऽथ पुष्पपुरं रम्यं नगरं पाटलीसुतम् || डेक्कन कॉलेज प्रत, नं. ३४५ ( १८७९-८). यावरून उदधी, उदयी किंवा उदायी यानें ३३ वर्षे राज्य केलें; व आपल्या राज्याच्या ४ थे वर्षी त्यानें कुसुमपुर स्थापिलें असे दिसतें. यावरून कुसुमपूर शहर इ० पू० ४९६ सालीं स्थापिलें हें कळून येतें. उदायी – इ० पू० ५०० ते ४६७ पर्यंत. चौथे वर्षी कुसुमपूर शहर बांधिलें.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही