पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. कांहीं बौद्ध परंपरा, हुएनत्सांग नांवाच्या चिनी प्रवाशाच्या हकीकर्तीत मिळतात; त्या ह्याः-- ( १ ) तथागताच्या निर्वाणानंतर १०० वे वर्षी अशोक नांवाचा एक राजा - विंबिसाराचा पणतू होता. १९८ यू- की, पु. २ - पृ. ८५. ( २ ) सी-यू- की २-९४ मधील मूळावरून नंदराजाचें अशोकाश ऐक्य दाखविलेले दिसतें; हा महानंदच असावा. सी पहिल्या व दुसऱ्या उल्लेखावरून, हा १०० वर्षांनंतरचा अशोक कालाशोक ऊर्फ महानंद असावा असे दिसतें. हा कालाशोक व धर्माशोक भिन्न होत. नवनंदांपैकी पहिला राजा जो महापद्मनंद त्यासच कित्येक कालाशोक समजतात; तशा समजुतीनेंच महावंसोनें त्यास नंदांत गणिलेला आहे. पण कालाशोक हा नंदांच्या पूर्वीच होता. यास प्रमाण असें आहे कीं, टर्नरसाहेबानें महावंसोच्या प्रस्तावनेंत त्याच्या टीकेंतील उताऱ्याचें भाषांतर दिलेले आहे. त्यावरून बुद्धानंतर १०० वर्षांनी दुसरी धर्मसंगीति भर- विणारा कालाशोक व नंदांपैकी पहिला राजा हे भिन्न होते हैं कळून येतें. टर्नरची प्रस्तावना, पृ. ३८ मध्ये म्हटले आहे कीं:-- “ Subsequent to Káláshoka, who patronised those who held the second Convocation, the royal line is stated to have consisted of 12 monarchs to the reign of Dharmà- shoka, when they held the third convocation. Kalashoka's own sons were ten brothers. Their names are specified in the अष्टकथा. The appelation of the नवनंद's originates in nine of them bearing that patronymic title. The अष्टकथा of the उत्तरविहार priests sets forth that the eldest of these was of an entraction ( Maternally )