पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. “ To these may be added, information given by धर्मा- धारी ब्रह्मचारी, who has lately been introduced to the pablic notice as the राजगुरु of Assam and who is well- versed in Buddha literature. २०१ According to him, the निर्वाण of शाक्यमुनी took place in the 18. th year of Ajatasatru, and 192 years before Chandra- gupta. " अजातशत्रूच्या १८ व्या वर्षी बुद्धाचें निर्वाण झालें, अशी एक पूर्वीही परंपरा दिलेलीच आहे; पण ती चुकीची होय. आठवे वर्षीच बुद्ध निर्वाण पावला; पण अजातशत्रूच्या १८ वे वर्षापासून चंद्रगुप्तापर्यंत १९६ वें वर्ष झाले असावें हें स्पष्टपणे दिसतें निर्वाण ८ वे वर्षों झालें असल्यामुळे ती १० वर्षे त्यांत मिळविली म्ह. १९६+ १० = २०६ वर्षी ( निर्वाणानंतर ) चंद्रगुप्ताचा काळ येतो. सारांश, निर्वाणानंतर ९० + ७२ = १६२ हा चंद्रगुप्ताचा खरा काळ नसून, निर्वाणानंतर ९० + ४३ + ७२ = २०५ हाच खरा काळ होय. सारांश, बौद्ध कालगणनेंत कालाशोकाला पहिला नंद मान- ण्यानें ४३ वर्षीचा घोटाळा झालेला आहे. जैन व बौद्ध परंपरा कांहीं पौराणिक परंपरांशी जमतात; यावरूनच एकमेकांचा परस्परांवर प्रकाश पडतो. शिशुनागवंशांतील राजांचा- निदान शेवटच्या पांच तरी – ( आम्ही दिलेला ) अनुक्रम व ( पुराणांतील ) का- लावधि बरोबर असावा असे वाटतें. एरव्हीं जैन व बौद्ध परंपरांशी हैं जुळतेंना. जैन व बौद्ध प्रमाणांवरून पहातां नवनंदांचा काळ ७२ वर्षांचा आहे. पुराणांनी हा काळ बरोबर १०० वर्षांचा बनावलेला आहे; तो कां बनविला हें पुढें कळेल. जैनांच्या मतें उदायीच्या मरणापासून चंद्रगुप्ता- पर्यंत १५५ वर्षे झाली. त्यांपैकी महापद्मापर्यंतची ४० + ४३ = ८३