पुराणनिरीक्षण. वर्षे वजा केली तर नवनंदांचीं ७२ च वर्षे राहतात. बौद्ध व जैन परंपरा जेथें याप्रमाणे नवनंदांचा काळ एकमतानें ७२ वर्षे देतात, तेथें पौराणि- कांच्या १०० या आंकड्यांवर भरवसा ठेवणें शक्य वाटत नाहीं. असो. सारांश, ३१२ चंद्रगुप्ताभिषेक. इ. पू. ३८४ नवनंदांची कारकीर्द. ४६७ उदायीचा खून. ४९६ कुसुमपुर बांधलें. २०२ " 72 53 असे काळ ठरवितां येतात. आतां बौद्धांचीं व पुराणांची नांवें व काळ जमत नाहींत एवढें खरें; पण कालाशोक हा नवनंदांपूर्वीचा राजा व त्यांचा बाप असून, तो पुराणां- तील महानंदाशी जुळतो हैं मीं वर दाखविलेलेच आहे. शिवाय बुद्धनिवी- णापासून महानंदाच्या प्रारंभापर्यंत ९० च वर्षे होतात. असो. परिक्षितीच्या जन्मापासून अभिषेकापर्यंत मागें वायुपुराणकर्त्याने दिलेल्या परंपरेवरून भारतीय युद्धाचा काळ याप्रमाणे ठरविला आहे:- - १५ वर्षे परि. च्या अभिषेकापासून ८३६," महापद्माच्या अभिषेकापर्यंत नंदाचा काळ (पुराणमतें) १०० एकूण. ९५१ हैं अनुमान जुन्या परंपरांवरून वायुपुराणाच्या अर्वाचीन लेखकानें काढि- लेले आहे. खरी परंपरा अशी असावी कीं, परिक्षितीच्या जन्मापासून तों ( महापद्माच्या नव्हे तर महानंदाच्या अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे झालीं. ही परंपरा जुळली तर असे काळ होतात.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही