पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ पुराणनिरीक्षण, १७ + उदायीचीं ३३ + व नंदिवर्धनाचीं ४० मिळून बरोबर ९० वर्षे होतात. यावरून अजातशत्रूपासून चंद्रगुप्तापर्यंतचा अनुक्रम व काळ हे दोन्ही बरोबर आहेत हैं जैन व बौद्ध परंपरांवरून पक्के ठरतें. उदायीच्या मरणापासून चंद्रगुप्तापर्यंत एरव्हीं ( ४० + ४३ + ७२ = ) १५५वर्षे होणें शक्यच नाहीं. यावरून भारतीय इतिहासाच्या ह्या भागाचा काळ पक्काच ठरतो व चंद्रगुप्ताचा काळ भारतीय युद्धापासून ९५१ वे वर्षी व इ० यू० ३१२ वर्षी हाही पक्काच होतो. यामुळे भारतीय युद्ध ९५१ + ३१२ = १२६३ इ० पू० झालें हेंही निर्विवाद ठरतें. बौद्धकालीन क्षत्रिय राजे.

बौद्धकाळापासून भारतवर्षाच्या खऱ्या इतिहासाला सुरवात होते, त्या- पूर्वीची कालगणना व इतिहास हीं दोन्ही कळत नाहीत अशी साधारणतः

  • Historians' His. of the World, Vol II मध्येही भारतीय युद्ध

“a few years before 1200 B. C" इ० पू० १२०० हून कांहीं वर्षांपूर्वी झाले असे म्हटलेले आहे. चंद्रगुप्ताचा काळ या इतिहासांत इ० पू० ३१२ हाच धरिलेला आहे. चंद्रगुप्तानें ( ग्रीकराजा ) सेल्यूकस याच्या कन्येशीं लग्न केल्याचा उल्लेख आहे:- चंद्रगुप्तस्तस्य सुतः पौरसाधिपतेः सुताम् । सुलूकस्य ततोद्वाह्य यावनी बौद्धतत्परः ॥ ४३ ॥ पष्टि वर्ष कृतं राज्यं बिंदुसारस्ततोऽभवत् । पितुस्तुल्यं कृतं राज्यं अशोकस्तनयोऽभवत् ॥ ४४ ॥ भविष्य पु. प्रति, खं. २, अ. ६. यांत चंद्रगुप्तास बुद्धाचा ' पुत्र' म्हटलें आहे तें कदाचित् शिष्य या अर्थी असेल, पण ' सुलूकाची यावनी कन्या ' परिणीत केल्याचा यांत स्पष्ट उल्लेख आहे; पण ( सुलूक ' पौरसाधिपति कसा ? पौरस देश होता ?