पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. समजूत आहे. आम्हांला देखील भारतकाळापासून तो बुद्धापर्यंतच्या राजांशीं विशेष कर्तव्य नाहींच. म्हणून बौद्धकालीन चंद्रसूर्यवंशांचें व मगधदेशचे राजे तेवढे पाहूं:- - मगधदेशचे. बिंबिसार. अजातशत्रु. उदायी. नंदिर्वधन. सूर्यवंशीय. प्रसेनजित्. क्षुद्रक, शूद्रक. रणक. सूरथ. चंद्रवंशीय. शतानीक. उदयन. वहीनर. दंडपाणि. निरमित्र. क्षेमक. महानंद. सुमित्र. | महापद्मनंदानें सर्व क्षत्रियांचा संहार केला. इ. पू. (३८४) | २०७ चंद्रवंश— चंद्रवंशापैकीं वत्सनाभिदेशांत, कौशांवी राजधानीत गौतम- बुद्धाचे वेळीं व नंतर कोष्टकांत दाखविलेले राजे राज्य करीत असत. ललितविस्तर नांवाच्या बौद्धग्रंथांत लिहिले आहे कीं, वत्सांचा उदयन राजा ज्या दिवशीं जन्मला त्याच दिवशी गौतमबुद्ध लुंबिनी नगराजवळील बागेत जन्मला. कौशाबी नगर यमुनेच्या कांठीं होतें. जैनांनीं श्रेणिक- ( बिंबिसार ) चरित्रांत म्हटलेलें आहे कीं, सिंधु देशांतील चेतक राजाची कन्या मृगावती ही शतानिकास दिली :- विषये वत्सनाभ्याख्ये कौशांबीपुरवासिने । सोमवंशे त्वनीकीय वितीर्णा द्वितीया सुता || श्रेणिकचरित्र, ८ - १९. कथासरित्सागरांत देखील उदयनाच्या आईचें नांव मृगावती असेंच दिलेलें आहे.