पुराणानिरीक्षण. उदयनास वत्सपति अगर वत्सराज म्हणत; यास जंगलांतून हत्तींची शिकार करण्याचा फार नाद असे. उज्जयिनीच्या चंडप्रद्योत राजाच्या शि- पायांनी एका कृत्रिम हर्त्तीत लपून यास पकडून नेलें, असें हर्षचरित्रांत म्हटलेले आहे. अवंतीच्या प्रद्योताची कन्या वासवदत्ता ही वत्सराज उदयनाच्या तीन राण्यांपैकी एकटी होती, असें धम्मपदाच्या टीकेंत उल्लेख आहे. उज्जैनीस महासेनाच्या (प्रद्योताच्या ) कैदेत असतां प्रद्यो- ताची कन्या वासवदत्ता इचें मन मोहून तिच्या साह्यानें, उदयनानें तिला पळवून नेली ! हा मोठा गायनवादनपटु होता. कालिदासानें याच उदय- नाचा मेघदूतांत उल्लेख केलेला आहे. ‘ प्रद्योतस्य प्रियदुहितरं वत्सरा- जोऽनुज हे । उदयनानें बनविलेल्या रक्तचंदनाच्या बुद्धाच्या मूर्ति कोसम येथें ज. कुनिंगह्याम यास मिळाल्या. २०८ उदयनानें वासवदत्तेखेरीज रत्नावली व प्रियदर्शिका यांशीही लग्न लाविलें होतें. याच उदयनाला पंचतंत्रांत वीणावत्सराज म्हटलेले आहे; कारण यास वीणा नेहमी प्रिय असे. उदयन एके दिवशीं वनविहार करून थकून दारूच्या धुंदीत पडला असतां, त्याच्या राण्या पिंडोल नांवाच्या बौद्ध भिक्षूचें प्रवचन ऐकण्यास गेल्या. हें पाहून राजानें रागाच्या भरांत पिंडोलचा छळ केला; पण पुढे पिंडोलभिक्षूची प्रत्यक्ष गांठ पडल्यावर राजाचें व त्याचें ' संयमा ' वर भाषण झालें. तेव्हांपासून उदयन बौद्धधर्मानुयायी झाला. उदयन गौतम- बुद्धाच्या मरणानंतरही जिवंत होता. उदयनास वासवदत्तेच्या पोर्टी वहीनर नांवाचा पुत्र झाला; हाच कथासरित्सागरांतला नरवाहनदत्त होय; यास तेथें कामाचा अवतार म्हटलेले आहे. मत्स्यपुराणानें याचा अनंगाचा तिसरा अवतार म्हणून याप्रमाणें वर्णन केलेलें आहे:- -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही