प्रकरण तिसरें. ततः प्रभृति राजानो भविष्याः शूद्रयोनयः । एकराट् स महापद्म एकच्छत्रो भविष्यति । अष्टाविंशति वर्षाणि पृथिव्यां तु भविष्यति ॥ सर्वक्षत्रानथोत्साद्य भाविनार्थेन चोदितः ।
२११ यानें सर्व क्षत्रियांचा नाश केला तेव्हां भारतीय युद्धापासून त्या त्या राजांच्या किती पिढ्या झालेल्या होत्या हें मात्स्यानें देऊन ठेविलेले आहे:- चतुर्विंशत्तथैक्ष्वाकाः पांचालाः सप्तविंशतिः । काशेयास्तु चतुर्विंशदष्टाविंशत्तु हैहयाः ॥ १४ ॥ कलिंगाश्चैव द्वात्रिंशदश्मका: पंचविंशतिः । कुरवश्चापि षड्विंशदष्टाविंशास्तु मैथिलाः ॥ १५ ॥ शूरसेनास्त्रयोविंशद्वीतिहोत्राश्च विंशतिः । एते सर्वे भविष्यंति एककालं महीक्षितः ॥ १६ ॥ मत्स्यपुराण, अ. २७२. बाकीच्या वंशांच्या राजांचीं आतां नांवें मिळतच नाहीत. मगधराजांच्या पिढ्या सांगण्याचें एथें कारण नव्हते; पण कुरूंच्या २६ व इक्ष्वाकु- कुळांतील राजांच्या २४ पिढ्या अनुक्रमें क्षेमक व सुमित्र यांच्यापर्यंत झाल्या ही परंपरा अतिशय महत्त्वाची होय !! ! महापद्मादि नवनंदांनी मिळून ( २८ + २२ + २२ = ) ७२ वर्षे राज्य केलें म्हणून मागें दाखविलेलेच आहे. यांच्या कारकीर्दीत विशेष महत्त्वाचें कांहीं घडलें नाहीं. अलेक्झांडरची हिंदुस्थानवर स्वारी याच्याच वेळीं इ. पू. ३२७ साली झालीं. शेवटीं इ. पू. ३१२ साली नंदांचा निःपात करून चाणाक्यानें चंद्रगुप्तास राज्यावर बसविलें !
- ‘ अष्टाशीति तु ' पाठभेद