पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. २१५ तेवढे सर्व त्यांनी पुराणांत नमूद करून ठेविलेले आहेत. त्यांतील कांहीं राजे मगधदेशचे कांहीं अवंतीचे, व कांहीं दक्षिणेतील असा प्रकार आहे. यांपैकी कित्येक समकालीन होते. वरील खारवेलाच्या लेखावरूनच पहातां, दक्षि- णेस शातकर्णी वंश इ. पू. १४८ च्या पूर्वीच चालू होता हैं तत्कालीन प्रमाणांवरून ठरतें. मौर्योचा काळ सर्वही पुराणांनी १३७ वर्षे दिलेला आहे, हा काळ बरोबरच दिसतो. तेव्हां मौर्याचें राज्य इ. पू. ३१२ ते १७५ पर्यंत होतें असे वाटतें; त्यानंतर शुंगवंशीय राजांचें ११२ वर्षे राज्य झालें असें म्हटलेले आहे. नंतर काण्व किंवा काण्वायनांनी ४५ वर्षे राज्य केलें; नंतर आंध्रभृत्य आले असे म्हटले आहे. यांची बेरीज करितां ( १३७ + ११२ + ४५ = ) २९४ वर्षे होतात; म्हणजे पुराणांच्या मतानें काळ व अनुक्रम बरोबर धरिला तर आंध्रभृत्यांचा प्रारंभ- काळ इ. पू. १८ हा येतो; पण मागें आपण पाहिलेंच आहे कीं, इ. पू. १४८ या पूर्वीच त्या वंशाची सुरवात झालेली असावी. यावरून पुरा- णांच्या सद्यःस्वरूपकारांस समकालीन राजांची कल्पना नसून त्यांनीं भिन्न भिन्न स्थळींच्या राजांचा अनुक्रम जोडला ही चूक केली हैं दिसून येतें. शुंग व काण्व हे मिळूनच राज्य करीत होते, हैं डॉ. भांडारकर यांनी दाखविलेलेंच आहे. तसेंच बृहद्रथवंशीय राजे मगधदेशांत राज्य करीत असतां प्रद्योत, पालकादि वीतिहोत्र कुळीचे राजे अवंतीस राज्य करीत होते हैं आम्ही वर दाखविलेलें आहे. असो. तूर्त आम्हांस पुराणांनी (सद्यःस्वरूपकर्त्यांनी ) महापद्मापासून आंध्रांतापर्यंत ८३६ वर्षे कसा काळ ठरविला हें आपणास पहावयाचें आहे. अर्वाचीन पौराणिकांनी १००+ १३७+ ११२ + ४५ + आंध्रांचा काळ यांची बेरीज करून ८३६ही वर्षसंख्या वायु व मत्स्यांत दिली असावी हैं उघड होतें. तेव्हां आपण आंध्रांचा काळ वायु व मत्स्याप्रमाणे पाहूं:- ( डॉ. भांडारकरांचा दक्षिणचा इतिहास )