पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. Eras, हाJulyजुलै १९१० च्या इंडियन रिव्ह्यूमधील लेख, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या योगें आंध्रभृत्यांचा काळ ठरवितां येतो. रा. आय्यरनी ४५६३ वर्षे संपूर्ण काळ धरिला आहे; पण पूर्वीच्या पौराणिक प्रमाणांवरून पाहतां हा काल ४४२ वर्षे मात्स्यानें धरिला होता असे दिसतें. २१८ १ मागें दिलेल्या यादीवरून कांहीं मुख्य मुख्य राजांचें काळ ठरविता. ( १ ) पहिला राजा शिशुक-सिंधुक-शिपक यासच नानाघाट शिला लेखांत सिमुक सातवाहन म्हटलेले आहे. (इ. पू. १९१ १६८ ) ( २ ) कृष्ण - याचा नाशिक गुहालेखांत उल्लेख आहे. ( कारकीर्द इ. पू. १६८-१५० ). ( ३ ) मल्लकर्णि-श्रीशातकर्णि - ( कारकीर्द इ. पू. १५०-१४०) कलिंगदेशच्या खारवेल राजाकडे यानें मौर्यकाल १६५ ( म्ह. इ. पू. १४७ ) मध्यें दूत पाठविले. ( ६ ) शातकर्णि- ( कारकीर्द १०४-४८ इ. पू. ) काळकाचार्य, नागार्जुन, व उज्जैनीचा विक्रमादित्य यांचा समकालीन होता. विक्रमादि- त्यास यानें नर्मदेच्या दक्षिणेस येऊं दिलें नाहीं. यानेंच बहुधा गुंगांचा अ- वशेष व काण्वायनवश याचा इ. पू. ६३ वें वर्षी उच्छेद केला. *

  • आंध्रांपैकी एका राजानें शुंगांचा अवशेष व काण्व राजे यांचा उच्छेद

केला, हें डॉ. भांडारकर यांनी दाखविल्याप्रमाणे खालील वाक्यावरून खरें दि- सतें; मात्र उच्छेद करणारा सिसुक - सिंधुक ( पहिला राजा ) नसून हा सहावा शातकर्णीच असावा. यानें पाटलीपुत्रांतील शुंगांच्या अवशेषाचा व (बहुधा विदिशा नगरीत राज्य करीत असलेल्या ) शंगांचे पेशवे काण्व यांचा पाडाव केला असावा; शुंग मूळचे विदिशा नगरीचे राजे असून त्यांनी पाटलीपुत्रांत राज्य करावयास लागल्यानंतर पुढे काण्वांना आपले व्हाईसराय म्हणून आपल्या पूर्वीच्या विदिशा नगरांत नेमिलें असावें. या काण्वांना ४५ वर्षे राज्य केले व यांचा अंत शुंगांबरोबरच शातकर्णीने केला. यामुळे काण्वांची कारकीर्द