प्रकरण तिसरें. ( १३ ) कुंतल–वात्स्यायनाच्या कामसूत्रांत याचा उल्लेख आहे. - ( १७ ) हाल-सप्तशतीचा कर्ता- ( कारकीर्द इ. स. ९९-१०२ ) यानें विक्रमादित्य व शालिवाहन ( ६ वा ) यांचा सप्तशतीत उल्लेख केलेला आहे. ( २३ ) गौतमीपुत्र- ( कारकीर्द इ. स. १४२ - इ स. १६३ यानें शक, यवन व पल्लवांचा नाश करून पुन: आपला महाराष्ट्रा- [ मागील पानावरून पुढे चालू. ] ( विदिशा नगरीत ) इ. पू. १०८०-६३ पर्यंत झाली असावी, व शुंगांची कारकीर्द पाटलिपुत्रांत इ. पू. १७५ ते६३ पर्यंत झाली असावी. वायुपुराणांतील वाक्य असें: – ( मात्स्यांतही अशींच वाक्यें आहेत ). २१९ काण्वायनं ततो भृत्यः सुशर्माणं प्रसह्य तम् । शुंगानां चैव यच्छेषं क्षपयित्वा बलं तदा । सिंधुको ह्यंध्रजातीयः प्राप्स्यतीमां वसुंधराम् ॥ यावरून आंध्र पूर्वी मगध देशाचे मांडलिक असावेत; शंगांकडे राज्य गेल्यानंतर त्यांनी विदिशेत काण्वायनांस आपले प्रतिनिधि नेमून आंध्रांवर नजर ठेवण्यास सांगितले असावें; कारण, आंध्रांपैकी तिसऱ्या राजानें कलिंग देशाच्या खारवेल राजास मगध देशच्या राजांविरुद्ध मदत केली होती. पुढें आंध्रच प्रबळ होऊन त्यांनीं विदिशेतील काण्वांचाही पाडाव केला व पाटलीपुत्रांतील शंगांचाही पाडाव केला. ही गोष्ट इ. पू. ६३ वर्षी झाली. यावरून आंध्रांपैकी एकानें काण्व व शुंगांचा नाश केल्याचें खरें दिसतें; मात्र तो पहिला सिंधुक नसून साहबा शात- कार्ण असावा. डॉ. भाऊ दाजींच्या लेखसंग्रहांत, जैन परंपरेप्रमाणें एक शात- कर्णी नागार्जुन, खपुटाचार्य ऊर्फ पादलिप्ताचार्य, व कालकाचार्य यांचा सम- कालीन म्हणून दिलेला आहे. तो हाच साहावा राजा असावा. कालकाचार्यांच्या सूरिपदाचा काळ महावीरानंतर ४५३ वर्षे म्ह. इ. पू. ७४ पादलिप्ताचार्याचा काळ महावीरानंतर ४८० म्ह. इ, पू. ४७. पादलिप्तानें ध्वज उभारिला तेव्हां शातकर्णी हजर होता ! ( भाऊ दाजींचा लेखसंग्रह, पृष्ठ १२६ - १३१ पहा ).
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही