पुराणांतील कैलकिल यवन व शिलालेखांतील वाकाटकवंशीय राजे. डॉ० भाऊ दाजी यांनीं अजंठा येथील एका गुहेंतील लेख छापून त्यावर कांही आपली मतें प्रसिद्ध केलेली आहेत. हा लेख डॉ० भाऊ दाजींनी तीन वेळां तपासून लावला आहे. अजंठा येथील लेख व सेवु- नीचा ताम्रपट यांतील नांवांवरून पाहिले असतां शिलालेखांतील वाकाटक- वंशीय राजे व पुराणांतील कैलकिल यवन हे एकच असावेत, असें डॉ० महशूरांनी सुचविलें आहे, व त्यास त्यांनी कारणेंही पण दिलेली आहेत. तीं पुढें येतीलच. हे वाकाटकवंशीय राजे मध्यहिंदुस्तानांत इ० स० ५०० च्या पुढे ५०/६० वर्षेपर्यंत राज्य करीत असत, असें या लेखांवरून व आनुषंगिक इतर पुराव्यांवरून सिद्ध होतें. या दृष्टीनें कैलकिल यवन व वाकाटकवंश याचें एकीकरण ( Identification ) महत्त्वाचें आहे. पुरा- णांतील कैलकिल यवनांस किती काळ सांगितलेला आहे, व त्या काळाचा मेळ कसा पडतो हैं पुढें दाखविलेलेच आहे. यावरून काय काय गोष्टी निष्पन्न होतात हेंही तेथेंच कळून येईल. प्रथम शिलालेखांतील वाकाटक- वंशीय राजांविषयी मिळेल तेवढी माहिती देऊन मग पुराणांतील माहिती दिलेली आहे. यायोगें कोणासही तुलना करण्यास बरें पडेल. असो. AJANTA INSCRIPTION FROM CAVE. NO. XVI. अजंटा येथील १६ व्या गुहेतील या शिलालेखाचा उतारा आम्ही डॉ० भाऊ दाजी यांच्या लेखसंग्रहांतून घेतलेला आहे. (पृ. ५६ते पुढें पहा).
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही