पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें, येथे पहिल्या श्लोकांत 'पुराणसंहिताश्चक्रे' असे असावेसे वाटतें; त्याशि- वाय पुढे ' आद्यं सर्व पुराणानां ' इत्यादि जें म्हटले आहे त्याशी याचा मेळ कसा पडेल ? आख्यानें, उपाख्यानें, गाथा, कल्पशुद्धि इत्यादिकांच्या योगें व्यासांन पुराणसंहिता केली (किंवा केल्या); ती (त्या) आपला शिष्य रोमहर्षण यास सांगितली. त्यांचे सुमतिआदि सहा शिष्य होते. कश्यपवंशीय अकृतव्रण, सावर्णि, शांशपायन व रोमहर्षण यांनी चार संहिता केल्या. म्हणजे, पुराण- संहितांच्या चार एडिशन्स् [ Elitions ] झाल्या की काय ? भारताच्या पांच प्रति झाल्या हें उघडच आहे ! पहा. संहितास्तैः पृथक्त्वेन भारतस्य प्रकाशिताः । १-९१ ॥ तसेंच भविष्यपुराणांत म्हटले आहे की:-- ‘ भारतं वै पंचविधं ' प्रोक्तं येन महात्मना । सोऽयं नारायणः साक्षाद्वयासरूपी महामुनिः ॥ १-१-२६॥ येथें ' एवंविधं भारतं वै असाही पाठभेद आहे. भारताच्या पांच प्रती- प्रमाणेंच पुराणांच्या चार प्रति झाल्या असे दिसतें. भागवताच्या भक्तरंजनी टीकेंत 'पुराणसमुच्चय' ग्रंथांतून उग्रश्रव्याचा पुराणाध्ययनक्रम याप्रमाणें उतरून घेतलेला आहे:- - उग्रश्रवसः पुराणाध्ययनक्रमस्तु पुराणसमुच्चये उक्तस्तद्यथा । त्रय्यारुणिकश्यपसावर्ण्याकृतव्रणवैशंपायनहारीतेभ्यः षडभ्यः षट् पुराणानि । रोमहर्षणाचत्वारि | व्यासात्सप्त । एवं सप्तदशपुराणानि व्यासाश्रमेऽधीत्य भागवतं शुको वदिष्यतीति व्यासाज्ञप्त उग्रश्रवा अपि शुकमुखात् शुश्राव । ततः स नैमिषारण्यं जगाम । तत्र मुनिभि- र्बहुमानपूर्वकं व्यासशिष्यं रोमहर्षणपुत्रं ज्ञात्वा पैत्र्ये आसने स्थापितः।