पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें, तसेंच गोतमीचा वाप जो भवनाग तो बहुधा समुद्रगुप्ताच्या लेखांत आलेल्या नागसेनाचा पुत्र असावा. नऊ नाग राजे पद्मावती, कांतिपुरी व मधुरा या शहरांत व मगधदेशाचे गुप्त गंगेच्या कांठानें प्रयागापर्यंत राज्य करितील असें विष्णुपुराणांत म्हटले आहे. तेव्हां समुद्रगुप्ताच्या वेळ- चा नागसेन याचाच पुत्र भवनाग असावा. भवनागाची मुलगी गोतमी ही बहुधा विंध्यशक्तीला दिलेली असावी, व प्रवरसेन हा गौतमी व विंध्यशक्तीचा पुल, व रुद्रसेन हा त्याचा पुत्र म्हणून तो गोतमीचा पौत्र होय. याच इ० स० ४०० च्या सुमाराला होऊन गेलेल्या नाग- सेनाचा हर्षचरित्रांतही उल्लेख आहे. ' नागवंशाच्या नागसेनाचा घात त्याची मसलत बाहेर पडल्यामुळे, पद्मावतींत झाला ' असें हर्षचरित्रांत म्हटले आहे. तेव्हां, समुद्रगुप्तानें जिंकिलेला नागसेन व विष्णुपुराणांतील पद्मावर्तीतील नागराजे, व हर्षचरित्रांतील नागवंशाचा, व पद्मावती नगराचा हा नागसेन यांवरून पहातां हे सर्व एकच दिसतात. तेव्हां हर्षचरित्नांत ज्याचा मंत्रस्फोटामुळें पद्मावतीनगरीत घात झाला म्हणून सांगि- तलें आहे, तो समुद्रगुप्ताच्या वेळचाच नागसेन असावा, व विष्णुपुराणा- वरून पहातां पद्मावर्तीतील नागराजेच श्रेष्ठ असावे. समुद्रगुप्ताच्या लेखांत नाग व नागदत्त असे आणखी दोन नागवंशीय राजे आहेत; ते बहुधा विष्णुपुराणांत सांगितल्याप्रमाणें कांतिपुरी व मथुरा येथील नागवंशांपैकी असावेत. एकून समुद्रगुप्ताच्या वेळेसही आर्यावर्तात तीन ठाई नाग- वंशीय राजे होते; व हें विष्णुपुराणाच्या वर्णनाशी जुळतें. सेवुनीच्या ताम्रपटांतील भवनाग हा बहुधा पद्मावतीच्या नागवंशापैकी जो समुद्रगु साचा समकालील नागसेन त्याचाच पुत्र असावा; कारण वाकाटकवंशाचा अग्रकेसरी विंध्यशक्ति हा भलत्यासलत्या किरकोळवंशाच्या राजाची मुलगी करणार नाही. विष्णुपुराणावरून पहातां, व हर्षचरित्रावरून पहातां, पद्मा- वतीचे नागराजेच विशेष प्रसिद्ध होते असे दिसून येतें. असो. याप्रकारें इ० स० ५०० च्या नंतर ५०/६० वर्षेपर्यंत हा वाकाटक- वंश राहिला असावा. या कैलकिल किंवा कैनकिला यवनांनंतरच्या राजांचें वर्णन कांही २२९